शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठात ‘व्हिक्टोरिया अ‍ॅमेझोनिका’

By admin | Updated: December 20, 2015 00:15 IST

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती अधिविभागामध्ये उमललेले ‘वॉटर लिली’ अर्थात, ‘व्हिक्टोरिया अ‍ॅमेझोनिका’ या प्रजातीचे फूल हे सध्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

- आदित्य वेल्हाळ,  कोल्हापूरशिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती अधिविभागामध्ये उमललेले ‘वॉटर लिली’ अर्थात, ‘व्हिक्टोरिया अ‍ॅमेझोनिका’ या प्रजातीचे फूल हे सध्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. याचे कारण असे की, जगातील कमळ वर्गात मोडणारे हे सर्वांत मोठे फूल आहे. एरवी अ‍ॅमेझॉन नदीमध्ये आढळणाऱ्या या दुर्मीळ वनस्पतीची विद्यापीठाने केलेली लागवड यशस्वी ठरली आहे.कोलकाता येथील संशोधकांनी अ‍ॅमेझॉन खोऱ्यातून सर्वप्रथम या फुलाचे बी तेथील बॉटेनिकल गार्डनमध्ये आणले. शिवाजी विद्यापीठाचे डॉ. एस.आर.यादव यांनी या फुलाच्या बियाण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. मात्र, कोलकाता बॉटेनिकल गार्डनने यास नकार दिला. बंगलोर विद्यापीठाकडे याची रोपे असल्याचे समजल्यानंतर डॉ. यादव यांनी तेथे संपर्क साधला असता, त्या विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठासाठी या वनस्पतीची पाच रोपे उपलब्ध करून दिली.डॉ. यादव यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती विभागाच्या कृत्रिम तलावात ही रोपे लावली. ‘लीड गार्डन वनस्पती संवर्धन’ या कार्यक्रमांतर्गत या वनस्पतीची देखभाल करण्यात आली. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चार वर्षे या वनस्पतीची निगा राखण्यात आली. कोल्हापूरच्या वातावरणात ही रोपे रुजली आणि ७ डिसेंबरला या वनस्पतीचे पहिले फूल उमलले. शनिवारी यातील आणखी एक फूल उमलले आहे. दुसरी दोन फुले दोन-तीन दिवसांत फुलतील. त्यामुळे हे दुर्मीळ फूल पाहण्यासाठी पर्यावरणीप्रेमींनी गर्दी केली आहे. अ‍ॅमेझॉन नदी खोऱ्यात सापडणाऱ्या या फुलाला अमेरिकन शास्त्रज्ञांनी राणी व्हिक्टोरियाच्या सन्मानार्थ ‘व्हिक्टोरिया अ‍ॅमेझोनिका’ हे नाव दिले आहे. या वनस्पतीला अतिशय तीक्ष्ण काटे आहेत. तिच्या पानाचा घेर ३ मीटर, तर देठ ७ ते ८ मीटर लांब आहे. हे फूल सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान उमलते आणि त्यानंतर वातावरणात विशिष्ट प्रकारचा गंध पसरतो. दुसऱ्या दिवशी या फुलाच्या पाकळ्या गुलाबी होतात. त्याचे परागीभवन ‘बीटल’ जातीचे कीटक करतात.वनस्पतीशास्त्रातील ही एक ऐतिहासिक घटना असून, अधिविभागातील संशोधक व विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. त्यामुळे हे फूल पर्यावरणप्रेमी लोकांनी जरूर पाहावे.- डॉ. एस. आर. यादव, विभागप्रमुख