शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

बळीराजावर आभाळमाया

By admin | Updated: July 11, 2016 05:55 IST

जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी पुनर्वसु नक्षत्राचा मुहूूर्त साधत राज्यभर मुसळधार वर्षाव केला. नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला

मुंबई : जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी पुनर्वसु नक्षत्राचा मुहूूर्त साधत राज्यभर मुसळधार वर्षाव केला. नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला असून, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दोन दिवसांपासून जलधारा बरसत आहेत. पुणे जिल्ह्यात संततधार, खान्देशात भिज पाऊस सुरू आहे. तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे विदर्भातील नद्यांना पूर आले असून, गोसेखुर्दचे ३३ दरवाजे उघडावे लागले. नाशिकमध्ये तर गोदावरी दोन वर्षांनंतर प्रथमच दुथडी भरून वाहू लागल्याने मराठवाड्यातील जनता सुखावली आहे.राज्यात सर्वत्र दमदार पाऊस होत असून, गेल्या ४ दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ पावसाचे जूनची सरासरी भरून काढली असून, अनेक ठिकाणी गतवर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे़ गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला़ (लोकमत न्यूज नेटवर्क) गोदाकाठच्या गावांना इशारानाशिकमध्ये दिवसभरात १३३ मिमी पावसाची नोंद झाली. दोन वर्षांनंतर प्रथमच रविवारी गोदावरीला पूर आल्याने, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरातही अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. विदर्भातही पूर; चौघे बुडालेविदर्भातील नद्यांना पूर आले असून, जलाशय तुडुंब भरले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात कारसह चार जण नाल्यात वाहून गेले. भामरागड पाण्यात गेले आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले. मराठवाड्यात सर्वदूर पाऊसनांदेड जिल्ह्यातील सहा गावांचा काही वेळ संपर्क तुटला.औरंगाबादसह हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यात संततधार सुरू असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहेरकोल्हापूरसह सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्गात रविवारी मुसळधार पाऊस झाला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले. कोयना धरणातील पाणीसाठ्यात पाच टीएमसीने वाढ झाली. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली.गोदावरीला पूर आल्याने नाशिक येथील नदीपात्रातील दुतोंड्या मारुतीची मूर्ती रविवारी संध्याकाळी पाण्याखाली गेली. आजवर ज्या-ज्या वेळी मूर्ती पाण्याखाली गेली, त्या वर्षी भरपूर पाऊस होऊन गोदाकाठ सुजलाम् झाला होता. दोन वर्षांनंतर रविवारी ही घटना घडल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. नगर जिल्ह्यातील घाटघर, रतनवाडीसह भंडारदरा पाणलोटात व मुळा खोऱ्यातील हरिश्चंद्रगड परिसरात रविवारी अतिवृष्टी झाली . खडकवासला धरण क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.