शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याने घेतला वरपित्याचा बळी

By admin | Updated: April 21, 2016 05:04 IST

घरी लग्नाची धामधूम सुरू असतानाच वरपित्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी फर्दापूर (ता. सोयगाव) येथील जळगाव- औरंगाबाद महामार्गावर घडली.

फर्दापूर (जि. औरंगाबाद) : घरी लग्नाची धामधूम सुरू असतानाच वरपित्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी फर्दापूर (ता. सोयगाव) येथील जळगाव- औरंगाबाद महामार्गावर घडली. पाणीटंचाई असल्याने वऱ्हाडी मंडळींसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.फर्दापूर येथील कैलास शिवराम दामोदर (४९) यांच्या मुलाचा विवाह बुधवारी दुपारी होता. गावात पाणीटंचाई असल्याने पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कैलास दामोदर हे आपला भाचा योगेश बावस्कर व पुतण्या किरण यांना दुचाकीवर सोबत घेऊन एका शेतात जात होते. तेवढ्यात फर्दापूर बसस्थानकानजीक त्यांच्या दुचाकीला जळगावकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात कैलास दामोदर हे जागीच ठार झाले, तर योगेश व किरण हे दोघे गंभीर जखमी झाले. उष्माघाताने भिकाऱ्याचा मृत्यूबुलडाणा : उष्माघातामुळे मलकापूर येथे बुधवारी भिकाऱ्याचा मृत्यू झाला. अशोक भगवान सोनुने असे मृतकाचे नाव आहे. मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात व नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.बीडमध्ये उष्माघाताचा दुसरा बळीआष्टी : बीड जिल्ह्यात उष्माघातामुळे साबलखेड (ता. आष्टी) येथील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने उष्माघाताच्या बळींची संख्या दोनवर गेली आहे. योगीता अशोक देसाई (११) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. योगीताला रविवारी सांयकाळी ताप आला. तिला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी धानोरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उष्माघाताने तिचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काढला.अकोल्यात उष्माघाताचा बळीयवतमाळ : भर उन्हात हमाली करणाऱ्या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथे बुधवारी दुपारी घडली. रामू महादेव सोनवणे असे मृताचे नाव असून तो सायकल रिक्षाने हमालीचे काम करीत होता. दुपारी तो घरी आल्यानंतर चक्कर येऊन तो कोसळला. शेजाऱ्यांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, वैद्यकीय अधिकारी एम.के. बेग यांनी मृत घोषित केले. (वार्ताहर)