शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ठेका अभियंत्यांचा खड्डेप्रकरणी बळी

By admin | Updated: July 20, 2016 03:42 IST

रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेऊन महापालिकेने विरार आणि नालासोपारा विभागातील तीन अभियंत्यांना निलंबित केले.

विरार : रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेऊन महापालिकेने विरार आणि नालासोपारा विभागातील तीन अभियंत्यांना निलंबित केले. हे तीनही अभियंते ठेका पद्धतीवर काम करणारे आहेत. त्यांच्यावर ठपका ठेऊन जबाबदार असलेल्या कायमस्वरुपी अभियंत्यांना मात्र अभय देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वसई विरार परिसरातील अनेक मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि नागरीक त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी तक्रारी आल्यानंतर पालिकेने खड्डे बुजवण्यात कुचराई केल्याप्रकरणी अमित पाटील, विजय चव्हाण आणि किरण नाईक या तीन ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या ठेकेदारांना निलंबित केले आहे. अभियंत्यांनी वेळेत आणि योग्य पद्धतीने खड्डे भरले नाहीत असा ठपका त्यांचवर ठेवण्यात आला आहे.दरम्यान, वसई विरार पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारांचे वर्चस्व असून अनेक कायमस्वरुपी अभियंते आणि ठेकेदार यांच्यात बहुतेक ठेक्यांमध्ये छुपी भागीदारी आहे. त्यामुळे बांधकाम खात्यात निकृष्ट कामे, बिले काढताना हेराफेरी होत असल्याचा आरोप केला जातो. मध्यंतरी शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांनी आधीच झालेल्या कामांच्या पुन्हा निविदा काढल्याची सात प्रकरणे चव्हाट्यावर आणली होती. त्यामुळे ठेकेदारांशी भागीदारी आणि हितसंबंध असलेल्या अभियंत्यांना अभय देऊन ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या अभियंत्यांचा बळी घेतला गेल्याचा आरोप केला जातो. (प्रतिनिधी)