शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरने घेतला महिलेचा बळी

By admin | Updated: June 16, 2014 20:50 IST

अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेचे सिझर केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या तेल्हारा तालुक्यातील महिलेचे सिझर केल्यानंतर तिची प्रकृती गंभीर होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे या महिलेचा बळी गेला असून, येथील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील रहिवासी शारदा गोपाल तायडे या महिलेला प्रसूतीसाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी प्रसूती झाल्यानंतर या महिलेची प्रकृती खालावली. त्यानंतर तिच्या नातेवाइकांनी येथील डॉक्टरांची भेट घेऊन तातडीने उपचार करण्याची मागणी केली; मात्र कुणाचेही सोयरसूतक नसलेल्या येथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास हलगर्जी केली. त्यामुळे या महिलेची प्रकृती आणखीनच खालावली. त्यामुळे घाबरलेल्या येथील डॉक्टरांनी महिलेला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यास सांगितले. सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेचा काही तासातच मृत्यू झाला. सिझरनंतर दोन दिवस उपचार करण्यास टाळाटाळ केल्याने या महिलेचा मृत्यू झाला असून, या प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर वेळीच उपचार केले असते, तर आज तिचा मृत्यू झाला नसता; मात्र येथील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जी केल्यामुळे शारदाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी आरोग्य उपसंचालकांकडे केली असून, सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शारदाने एका मुलीला जन्म दिला असून, तिची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.**  प्रशासन पांघरूण घालणार ?जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे महिला व बालकांचे मृत्यू होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. गलथान कारभाराचा कळस म्हणजे मागील तीन महिन्यांपूर्वी प्रसूती झालेल्या एका महिलेचे बाळच गायब झाले होते. शोध घेतल्यानंतर सदर बाळ शौचालयाच्या टाक्यात सापडल्याचे सांगण्यात आले. डीएनए चाचणी करण्यात येणार, खर्‍या बाळाचा शोध घेण्यात येणार, या प्रकारचे आश्वासन त्यावेळी महिलेच्या नातेवाइकांना दिले; मात्र प्रकरण दडपण्यात आले. त्यानंतर पातूर येथील एका महिलेच्या पोटात प्रसूतीनंतर कापसाचा बोळा ठेवण्यात आला होता. सोमवारी एका महिलेचा येथील डॉक्टरांच्या चुकीमुळे आणि हलगर्जीमुळे मृत्यू झाला असून, या प्रकरणावरही येथील वैद्यकीय अधीक्षिका पांघरूण घालणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.