शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

हतबल मातेने घेतला आजारी नवजात चिमुकलीचा बळी

By admin | Updated: August 12, 2016 00:05 IST

दोन महिन्यांच्या चिमुकलीला वेदनातून मुक्त करण्यासाठी चक्क नाल्याच्या पाण्यात बुडवून इहलोकातूनच मुक्त केले.

ऑनलाइन लोकमत,औरंगाबाद, दि. 12 - जन्मजात आजारी असलेल्या आपल्या पोटच्या मुलीवर पैशांअभावी उपचारही करता येईनात अन् आजारामुळे तिला होणाऱ्या वेदनाही पहावल्या जाईनात, अशा परिस्थितीत सापडलेल्या मातेने अखेर आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकलीला वेदनातून मुक्त करण्यासाठी चक्क नाल्याच्या पाण्यात बुडवून इहलोकातूनच मुक्त केले. हतबलतेतून केलेले आपले हे निर्दयी कृत्य लपविण्यासाठी मातेने नंतर चिमुकलीच्या अपहरणाचा बनावही केला. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांमुळे या कृत्याचे बिंग फुटले. कल्याणी महेश साळुंके (१९, रा, जैतापूर, ता. कन्नड) असे या आरोपी मातेचे नाव आहे. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, कल्याणी हिचे माहेर औरंगाबादेतील बालाजीनगर येथे आहे. ११ जून रोजी घाटीत तिने एका चिमुकलीला जन्म दिला. तेव्हापासून ती माहेरी होती. जन्मताच तिच्या या चिमुकलीला गंभीर आजार असल्याचे निदान झाले. तिच्या डोळ्यातून रक्तस्त्राव होत होता. उपचारासाठी दिशा ठरविण्यासाठी डॉक्टरांनी बाळाचा एमआरआय करण्याचे सांगितले उपचाराला पैसेही नव्हते...कल्याणीच्या माहेरची आणि सासरची दोन्हीकडील आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एमआरआय करणे, इतर उपचार करणे कल्याणीसाठी अशक्यप्राय बाब होती. कल्याणीने पैशांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्नही केला; परंतु शक्य झाले नाही. पैशाअभावी तिची एमआरआय तपासणी करता आली नव्हती. दोन दिवसांपासून या चिमुकलीची प्रकृती अधिकच खालावली. तिच्या डोळ्यातूनही रक्तस्त्राव सुरू झाला होता. परिस्थितीने केले हतबलआपल्या चिमुकलीवर उपचारासाठी पैसेही नाहीत अन् आजारामुळे चिमुकलीला होणाऱ्या वेदनाही पहावल्या जाईनात म्हणून कल्याणी अस्वस्थ झाली होती. हतबल झाली होती. काय करावे, तिला काही सूचेना. शेवटी चिमुकलीला वेदनातून मुक्त करण्यासाठी कल्याणीने चक्क तिला इहलोकातूनच मुक्तता देण्याचा निर्दयी निश्चय केला. गुरुवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास कल्याणीने काळजावर दगड ठेऊन चिमुकलीला घराजवळच असलेल्या नाल्यात नेले. तेथे नाल्याच्या पाण्यातच तिला बुडविली. त्यामुळे क्षणातच चिमुकलीचा अंत झाला. नंतर कॅरीबॅगमध्ये प्रेत टाकून ती कॅरीबॅग नाल्यातच टाकून कल्याणी घरी आली. दोन तासातच फुटले बिंगमुलीला संपवून घरी आल्यानंतर कल्याणीला रडू कोसळले. शेजाऱ्यांनी विचारणा केल्यानंतर कुणी तरी आताच आपल्या मुलीला घरातून उचलून पळ काढला, असा बनाव तिने केला. या घटनेची माहिती एका शेजाऱ्याने थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाच कळविली. आयुक्तांनी तात्काळ गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती व जवाहरनगर पोलिसांना तपासाचे काम सोपविले. पो.नि. मनीष कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर कल्याणीसह तिचे आई-वडील आणि भावाला घेऊन ठाण्यात आले. तेव्हा कल्याणीने सांगितलेल्या माहितीत काही तरी काळेबेरे असल्याचा संशय पोलिसांना आला. मग विश्वासात घेऊन पोलिसांनी कल्याणीला विचारणा केली. अखेर हंबरडा फोडत कल्याणीने आपल्या कृत्याची कबुली दिली. चिमुकलीचा कोठे खून केला आणि प्रेत फेकले, हे घटनास्थळ पोलिसांना तिने दाखविले. शोध घेऊन पोलिसांनी ते प्रेत ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, असे पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी सांगितले.