शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बँडस्टँडवर सेल्फीच्या नादात तरुणीने गमावला जीव

By admin | Updated: May 4, 2017 05:08 IST

बहिणीसोबत बँडस्टँडवर सेल्फी काढणे तरुणीच्या जिवावर बेतले. मीनाचल दुराई (२१) वर्ष असे मृत तरुणीचे

मुंबई : बहिणीसोबत बँडस्टँडवर सेल्फी काढणे तरुणीच्या जिवावर बेतले. मीनाचल दुराई (२१) वर्ष असे मृत तरुणीचे नाव असून, ती मूळची तामिळनाडूची रहिवासी आहे. मुंबई दर्शनासाठी ती कुटुंबीयांसोबत आली होती. मात्र, हेच दर्शन तिचे अखेरचे ठरल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.मूळची तामिळनाडूची रहिवासी असलेली मीनाचल ही आई-वडील आणि बहिणीसोबत पहिल्यांदाच मुंबई दर्शनासाठी आली होती. मीनाचलच्या हट्टामुळे सर्व जण बँडस्टँड पाहायला आले. सोमवारी दुपारी ४च्या सुमारास मीनाचल बहिणीसोबत बँडस्टँडच्या किनाऱ्याजवळ आली. तेथे ती बहिणीसोबत ती सेल्फी काढत होती. त्याच दरम्यान, खडकावरून पाय घसरून ती पाण्यात पडली. आईवडिलांच्या डोळ्यादेखत ती बुडत होती. तिला वाचवण्यासाठी आईवडिलांनी आरडाओरड केली. ती ऐकताच तेथे फिरायला आलेले इतर पर्यटक धावत आले. मात्र, तोपर्यंत ती खोलवर बुडाली होती. स्थानिकांच्या मदतीने तिच्या बचावासाठीचे प्रयत्न सुरू झाले. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेतली. उशिराने तिला बाहेर काढण्यात आले. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे दाखल करण्यापूर्वीच मीनाचलला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे दुराई कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सेल्फीचा नाद चर्चेत आला आहे. त्यामुळे तरुण-तरुणींनी आता तरी जीवघेण्या सेल्फीच्या नादावर आवर घालावा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)आवाहन झुगारून काढला सेल्फीगेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बँडस्टँडवर सेल्फी काढत असताना, गोवंडी बैंगनवाडी येथील करन्नुम अन्सारी (१८), अंजुम खान (१७) आणि मुशत्री खान (१८) या तीन मैत्रिणी समुद्रात बुडाल्या. यामध्ये करन्नुमसह तिला वाचविण्यासाठी गेलेल्या रमेश वळूंज (३५) या स्थानिकांनाही जीव गमवावा लागला. त्यामुळे समुद्रकिनारे, चौपाट्यांवर नो सेल्फी झोन घोषित करण्यात आले. मीनाचल उभी असलेल्या ठिकाणीही सेल्फीस मनाई असल्याचे आवाहन करणारा बोर्ड होता. तरीही ती मोह आवरू शकली नाही.