शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘अपुऱ्या सुविधांनीच घेतला बळी’

By admin | Updated: October 2, 2016 01:25 IST

वाडा तालुक्यातील सोनशिव येथे सोमवारी (२६ सप्टेंबर) अल्पशा आजाराने मृत्यू पावलेले आमचे बाळ हे कुपोषित नव्हते तर येथील ग्रामीण रुग्णालयांतील अपुऱ्या सुविधांमुळे त्याच्यावर

वाडा : वाडा तालुक्यातील सोनशिव येथे सोमवारी (२६ सप्टेंबर) अल्पशा आजाराने मृत्यू पावलेले आमचे बाळ हे कुपोषित नव्हते तर येथील ग्रामीण रुग्णालयांतील अपुऱ्या सुविधांमुळे त्याच्यावर तत्काळ उपचार होऊ न शकल्यामुळेच त्याचा बळी गेला असल्याची खंत या बाळाच्या पालकांनी आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्याकडे व्यक्त केली. शुक्रवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी सोनशिव येथे जाऊन वेदांतच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ‘वाडा ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ असता तर निश्चितच त्याचा जीव वाचला असता. येथील अपुऱ्या सोयींमुळे आमचे बाळ गेले,’ असे महेश मढवी यांनी सवरा यांना सांगितले. (प्रतिनिधी) - ‘आमच्या नातवावर जी वेळ आली ती इतरांवर येऊ नये यासाठी सरकारी दवाखान्यात सोयी-सुविधा ठेवाव्यात,’ असे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मयत वेदांतचे आजोबा महादू मढवी यांनी या वेळी सांगितले. वेदांतचा मृत्यू हा कुपोषणाने झाला असल्याचा आरोप विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी करून, शासन-प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली. - वेदांत कुपोषित नव्हताच, पण यापूर्वी तो कधी गंभीर आजारीही नव्हता. पण आज तो आमच्यात नाही हे मानायला मन तयार नाही, असे वेदांतच्या आजी सविता मढवी यांनी सांगितले. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालयांत, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील तसेच सोयी-सुविधा पुरविण्यास शासन विशेष लक्ष देईल, असे विष्णू सवरा यांनी या वेळी सांगितले.