शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पीडितेने बलात्कार नाकारूनही शिक्षा

By admin | Updated: June 13, 2017 10:42 IST

बलात्कार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईने न्यायालयात साक्ष देताना घडलेला प्रकार झालाच नाही, असे सांगितले असताना

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 13 : बलात्कार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईने न्यायालयात साक्ष देताना घडलेला प्रकार झालाच नाही, असे सांगितले असताना पीडित मुलगी, तिला झालेले बाळ आणि बलात्कार करणारा तरुण यांचा डीएनए टेस्टचा अहवाल आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तरुणाला १० वर्षे सक्तमजुरी आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.विशेष न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.मयूर लालासाहेब शिंदे (वय २२, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत १५ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील संजय पवार यांनी ४ साक्षीदार तपासले. त्यामध्ये चेतन महिला सेवा मंडळाच्या संचालक महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली. मार्च २०१५ मध्ये ही घटना घडली. मयूर आणि पीडित मुलीची ओळख झाली. त्यानंतर मयूरने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्याच्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी तो या मुलीला भेटण्यास टाळाटाळ करू लागला. ह्यतुझा आणि माझा काही संबंध नाही. मला फोन करत जाऊ नको,ह्ण असे म्हणून मयूर त्या मुलीला टाळत होता. त्यानंतर ती मुलगी ५ महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्या वेळी चेतन सेवा महिला मंडळ येथे या मुलीला दाखल करण्यात आले. तिथे तिने मुलाला जन्म दिला.चेतन सेवा महिला मंडळाच्या संचालिकेने प्रोत्साहन दिल्याने मुलीने याबाबत फिर्याद दिली होती. मात्र, सुनावणीदरम्यान ती आणि तिची आई फितूर झाल्या. सरकार पक्षाने ४ साक्षीदार तपासले.डीएनए टेस्ट अहवाल आणि सरकारी वकील संजय पवार यांनी उच्च न्यायालयातील विविध न्यायनिवाड्यांचे दिलेले दाखले ग्राह्य धरून न्यायालयाने भारतीय दंडसंहिता कलम ३७६ (बलात्कार) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार ही शिक्षा सुनावली