शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

विहिंप, बजरंग दलाची आदळआपट

By admin | Updated: September 8, 2016 02:47 IST

गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर कमानी व केलेली बॅनरबाजी याविरोधात मीरा-भार्इंदर पालिकेने धडक कारवाई सुरू केल्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा पापड मोडला आहे.

भार्इंदर : गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर कमानी व केलेली बॅनरबाजी याविरोधात मीरा-भार्इंदर पालिकेने धडक कारवाई सुरू केल्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा पापड मोडला आहे. युतीच्या सत्ताकाळात हिंदूंच्या सणानिमित्त लावलेल्या बॅनर, कमानींवर होत असलेल्या कारवाईविरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांसह भाजपा गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर गीता जैन यांची बुधवारी भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर बॅनर, रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या कमानींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हे बॅनर्स व कमानी यांचा थेट संबंध गणेशोत्सव मंडळांच्या निधी संकलनाशी असल्याने व त्यालाच फटका बसल्याने अनेक गणेश मंडळांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बॅनर व कमानी लावल्याने गणेश मंडळांना निधी मिळत असल्याने किमान उत्सवाच्या काळात तरी कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांकडे केली. पालिकेच्या कारवाईला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. कारवाईचा जाब विचारण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे किशोर बन्सल, प्रेमचंद दुबे, गौरव सिंग, बजरंग दलाचे व भाजपा नगरसेवक डॉ. सुशील अग्रवाल, आशीष यादव, भाजपा सृष्टी मंडळाचे गजानन नागे, अशोक तोर, शिवसेनेचे सूर्यकांत भोईर यांच्या शिष्टमंडळाने महापौर गीता जैन व आयुक्त डॉ. नरेश गीते यांची बुधवारी भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत मुंबई व ठाणे मनपा हद्दीत गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात बॅनर्स व कमानी लावण्यात आल्या असून तेथील स्थानिक प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणले. मीरा-भार्इंदर मनपा मात्र परवानगी देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शहरात व राज्यात युतीची सत्ता असतानाही हिंदूंच्या सणात कारवाईचे विघ्न जाणीवपूर्वक आणले जात असल्याचा आरोप विहिंप व बजरंग दल यांनी केला. महापौर जैन यांनी कायद्यावर बोट ठेवून मीरा-भार्इंदर पालिका न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करीत असून कारवाई सुरूच राहील, असे ठामपणे सांगितले. शिष्टमंडळाने दिलेले निवेदन पालिकेमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल, असे मोघम उत्तर आयुक्त डॉ. गीते यांनी दिले. (प्रतिनिधी)