शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

व्ही.जी. पाटील खुनाबद्दल जन्मठेप

By admin | Updated: November 16, 2014 01:45 IST

काँग्रेसचे तत्कालीन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजू सोनवणो याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.जे. शेगोकार यांनी शनिवारी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.

जळगाव : काँग्रेसचे तत्कालीन  जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजू सोनवणो याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.जे. शेगोकार यांनी  शनिवारी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. सीबीआयने राजू सोनवणोला केलेल्या फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती; परंतु त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळली. 
 या प्रकरणातील इतर दोन आरोपी दामोदर लोखंडे व लीलाधर नारखेडे यांच्याविरुद्धही खटला चालविण्यात येणार असून, न्यायालयाने त्यांना 8 डिसेंबर रोजी हजर होण्याचे आदेश  दिले. 
प्रा. व्ही.जी. पाटील यांचा 21 सप्टेंबर 2क्क्5 रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास जळगावातील मानराज पार्कजवळील नेत्रदीप अपार्टमेंटजवळ दोघा अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी धारदार शस्त्रंनी वार करून खून केला होता. 
या प्रकरणी न्या. डी.जे. शेगोकार यांनी शुक्रवारी आरोपी राजू चिंतामण सोनवणो (वय-3क्, रा. बहादरपूर, जि. ब:हाणपूर) याच्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याचे जाहीर केले 
होते. त्याला फाशी द्यावी की 
जन्मठेप यावर शनिवारी दुपारी युक्तिवाद झाला. सीबीआयचे 
वकील डी.एन. साळवी यांनी राजू सोनवणो याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. तर आरोपीचे वकील एस.के.कौल यांनी आरोपीचे वय, त्याच्यावर अवलंबून असणा:या कुटुंबीयांचा विचार करून कमीतकमी शिक्षा देण्याची विनंती केली होती.
 
असे आहे शिक्षेचे स्वरूप
शनिवारी संध्याकाळी 5 वाजता न्या. शेगोकार यांनी आरोपी राजू सोनवणो याला कलम 3क्2 प्रमाणो जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची तर कलम 12क् ब प्रमाणो 1क् वर्ष सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास दीड वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी हा 9 वर्षे 45 दिवस कारागृहात होता तितक्या दिवसांची त्याला सूट मिळेल. दोन्ही शिक्षा त्याला एकाच वेळी भोगाव्या लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
दोघांविरुद्ध 8 डिसेंबरपासून कामकाज
या खटल्यातील इतर आरोपी दामोदर लोखंडे व लीलाधर नारखेडे या दोघांविरुद्ध 8 डिसेंबरपासून खटला चालविण्यात येणार असून, त्यांनी तारखेला हजर राहावे असे आदेश दिले. तर डॉ. उल्हास पाटील व डॉ. जी.एन. पाटील यांना आरोपी करण्याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या दोघांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.