शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या दिवशीच पशुप्रेमीची आत्महत्या !

By admin | Updated: July 2, 2016 03:02 IST

वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सीवूड येथे घडली आहे.

नवी मुंबई : वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सीवूड येथे घडली आहे. या पशुप्रेमी तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याच्याकडील श्वानांची काळजी घेण्याचे घरच्यांना सुचवले आहे. परंतु त्याच्या आत्महत्येचे ठोस कारण समजले नसून एनआरआय पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे. शुभम देसाई (२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सीवूड सेक्टर ४६ येथील गुरुदत्त सोसायटीत तो अनेक वर्षांपासून सहकुटुंब रहायला होता. शुभम हा लहानपणापासूनच परिसरात पशुप्रेमी म्हणून परिचित होता. ८ ते १० वर्षांपूर्वी भटक्या श्वानाला मारणाऱ्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाविरोधात पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. पुढे याच श्वानप्रेमातून त्याने पाळीव श्वान विक्री व सांभाळण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता. जन्मदिवस असल्यामुळे बुधवारी रात्री तो घरच्यांना जेवणासाठी हॉटेलमध्ये घेवून गेला होता, तर त्यांना हॉटेलमध्ये बसवल्यानंतर मित्रांना पार्टी देण्यासाठी नेरुळला गेलेला. तिथून काही वेळातच परत आल्यानंतर घरच्यांना हॉटेलमध्येच बसवून काही कारणाने तो एकटाच घरी गेला. परंतु बराच वेळ होवूनही तो परत न आल्यामुळे सर्व जण घरी गेले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. यामुळे दरवाजा तोडला असता आतमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत शुभमचा मृतदेह आढळून आला.घरच्यांना व मित्रांना पार्टी दिल्यानंतर आत्महत्येसाठी दुकानातून रस्सी खरेदी करून तो घरी गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये शुभमला येणे असलेल्या पैशाचा हिशेब तसेच श्वानांप्रति प्रेमही व्यक्त केलेले असल्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बगाडे यांनी सांगितले. कुत्र्यांना त्रास देवू नका, त्यांना मारू नका असे सांगत आपल्या पश्चात त्यांची काळजी घेण्याचे त्याने चिठ्ठीमध्ये लिहिलेले आहे. एनआरआय पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली.