शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं निधन

By admin | Updated: September 1, 2016 20:27 IST

युनियन नेते शरद राव यांचं निधन झालं आहे.नानावटी रुग्णालयात त्यांचं निधन झालं.

- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे गुरूवारी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते नानावटी रूग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत होते. अखेर या जीवघेण्या आजारासोबतची त्यांची लढाई अयशस्वी ठरली. राव यांच्या पश्चात त्यांचा मुलगा शशांक, मुलगी शिल्पा आणि नातवंडे असा परिवार आहे.शशांक राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा कॅनडाला वास्तव्यास असून शनिवारी, ३ सप्टेंबर रोजी सकाळी त्या मुंबईत येतील. तोपर्यंत पार्थिव शीतगृहात ठेवण्यात येणार आहे. शनिवारी शिल्पा आल्यानंतर सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत राव यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येईल.गोरेगावातील लिंक रोड शेजारील बांगुर नगरमधील जलनिधी सोसायटी येथील राहत्या घरापासूनच अंत्ययात्रेला सुरूवात होईल. दुपारी ओशिवरा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.कामगार क्षेत्रातील अनेक संघटित आणि असंघटित कामगारांच्या संघटनांचे नेतृत्त्व राव करत होते. महापालिका कर्मचारी, फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक, बेस्ट अशा विविध कामगारांच्या संघटनांचे नेतृत्त्व करताना राव यांनी रस्त्यावर उतरून हजारो आंदोलने केली. दिवंगत कामगार नेते दत्ता सामंत यांच्यानंतर एकमेव लढवय्ये नेतृत्त्व म्हणून राव यांची ओळख होती.त्यांच्या जाण्याने उभ्या कामगार विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.............................................लढाऊ नेतृत्व काळाच्या पडद्याआडशरद राव यांच्या निधनाने संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे संघर्षशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. बॉम्बे लेबर युनियनपासून आपल्या कामगार चळवळीला सुरुवात करणाऱ्या राव यांचा मुंबईतील कामगारक्षेत्रावर मोठा प्रभाव होता. महापालिका कर्मचारी, बेस्ट उपक्रम, फेरीवाला, रिक्षा चालक-मालक, टॅक्सी यासह विविध संघटनांचे नेतृत्व करताना त्यांनी कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे प्रश्न व्यासपीठावर मांडले. कामगारांच्या हिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जोपासणाऱ्या राव यांच्या निधनाने कामगार चळवळीचे नुकसान झाले आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री