शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ज्येष्ठ पत्रकार वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2016 03:39 IST

ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालिका वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे शुक्रवारी सकाळी दादर येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालिका वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे शुक्रवारी सकाळी दादर येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वय ७० वर्षे होते. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांच्या त्या पत्नी होत्या. रविवारी सकाळी ११ वाजता दादर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती सुधीर नाईक, कन्या राधिका देशपांडे, जावई आशुतोष देशपांडे आणि नात असा परिवार आहे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी संस्कृत हा विषय घेऊन बी.ए. ही पदवी विद्यापीठातून मिळविली होती. विल्सन महाविद्यालयातून एम.ए.चे प्रशिक्षण घेत असतानाच त्यांची संस्कृत भाषा शिकवण्यासाठी नियुक्ती झाली होती. मराठी आणि संस्कृत भाषेच्या त्या गाढ्या अभ्यासक होत्या. नाईक यांनी ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून जबाबदारी सांभाळली, तर ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या कार्यकारी संपादक आणि‘नवशक्ति’च्या संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुरवणी विभागाच्या संपादपकपदीही त्या होत्या. अ.भा. मराठी साहित्य परिषद अध्यक्षा, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या तसेच मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या संचालक म्हणूनही त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. (प्रतिनिधी)