शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे निधन

By admin | Updated: September 19, 2016 06:02 IST

ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे हृदयविकाराने शनिवारी रात्री निधन झाले.

मुंबई : ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे हृदयविकाराने शनिवारी रात्री निधन झाले. आयुष्यभर संगीतसेवेचा अखंड ध्यास घेतलेल्या नंदू होनप यांची प्राणज्योत एका कार्यक्रमात संगीतसाधना करतानाच मालवली. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भक्तिसंगीताच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारा संगीतकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. रवींद्र नाट्य मंदिरात शनिवारी रात्री नंदू होनप यांची गाण्यांची मैफील होती. मैफिलीच्या अंतिम चरणी त्यांनी त्यांचे गाजलेले ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी..’ हे गाणे वाजवायला घेतले होते; आणि या गाण्याचा शेवट होत असतानाच ते कोसळले. रविवारी सकाळी दादर येथील त्यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ गायक अजित कडकडे, जयंत ओक, गायिका अनुराधा पौडवाल, नेहा राजपाल आदी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नंदू होनप हे भक्तीसंगीताच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले होते. श्री गुरुदेव दत्ताची गाणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. 'निघालो घेऊन दत्ताची पालखी’, ‘स्वामी कृपा कधी’, ‘अक्कलकोट स्वामींची पालखी’, ‘तूचि आशा श्रीगणेशा’, ‘विठ्ठल बावरा’, ‘गण गण गणात बोते’ अशी अनेक भक्तिगीते त्यांनी संगीतबद्ध केली होती. अजित कडकडे, अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे अशा आघाडीच्या गायकांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ही गाणी गायली. भक्तीगीते आणि अभंगवाणी यावर त्यांची हुकूमत होती. पण त्यासह भारुडे, स्तोत्रे, लावणी, भावगीते असे संगीताचे प्रकारही त्यांनी हाताळले होते. ‘आकाशवाणी’वरील विशेष गीतगंगा यात त्यांनी सहभाग नोंदवला होता. अनेक चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. मात्र १०० चित्रपटांना संगीत देण्याचे त्यांचे स्वप्न त्यांच्या निधनाने अपूर्ण राहिले. 'विश्वास' हा त्यांनी संगीतबद्ध केलेला अखेरचा चित्रपट ठरला.नंदू होनप हे व्हायोलिन वादनातही निपुण होते. त्याच्या व्हायोलिनची साथ ‘सावन आया है’, ‘सुनो ना संगे मरमर’, ‘दगाबाज रे’ अशा हिंदी गाण्यांनाही लाभली होती.>भक्तीसंगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलिन वादक नंदू होनप यांच्या व्हायोलिन वादनात जादू होती. त्यांनी आपल्या संगीताच्या कारकीर्दीत त्यांच्या संगीत रसिकांना अभंग आणि भजनाचा अजरामर नजराणा दिला होता. - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री