शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

रेतीउपशामुळे वैतरणा रेल्वे पूल धोक्यात

By admin | Updated: August 5, 2016 02:47 IST

वैतरणा खाडी पात्रात संक्शन पंप आणि बोटीने बेसुमार रेती उपसा सुरुच असून त्यामुळे वैतरणा रेल्वे पूलाला धोका पोचण्याची शक्यता आहे.

वसई : वैतरणा खाडी पात्रात संक्शन पंप आणि बोटीने बेसुमार रेती उपसा सुरुच असून त्यामुळे वैतरणा रेल्वे पूलाला धोका पोचण्याची शक्यता आहे. रेती उपशामुळे १ आॅगस्ट २०११ ला पूलाशेजारची जमीन तब्बल २५ फूट खोल सरकली होती. त्यानंतर या परिसरात रेती उत्खनन करण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच पूलाखालुन ट्रकच्या वाहतूकीला बंदी घालण्यात आली होती. मात्र, वैतरणा खाडीत बेसमुार रेती उपसा सुरुच असल्याने वैतरणा पुलाला धोका पोचण्याची शक्यता वाढली आहे. वैतरणा खाडी आणि वैतरणा रेल्वे पूलाच्या परिसरात रेती उत्खननाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात संक्शन पंपाने मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन केले जात आहे. संक्शन पंप एकावेळी हजार ब्रास रेती उत्खनन करीत असल्याने यापरिसरातील किनारे खचले आहेत. याविरोधात रेती उत्पादन संघाने हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. त्यावेळी कोर्टाने संक्शन पंपाने रेती उत्खनन करण्यास बंदी घातली होती. मात्र, बंदी हुकुम झुगारून आजही दिवस-रात्र रेती उत्खनन सुरु आहे.यामुळे वैतरणा रेल्वे पूलाला धोका असल्याची तक्रार केली जात होती. पण, कुणीही लक्ष न दिल्याने १ अ‍ेॉगस्ट २०११ रोजी वैतरणा पूलाशेजारील जमिन तब्बल २५ फूट खचली होती. एका मोटारमनच्या सावधानतेमुळे मोठा अपघात होण्यापासून रेल्वे बचावली होती. त्यानंतर तब्बल दहा दिवस रेल्वेने काम करून पूलाशेजारच्या भागात भराव करण्यात आला होता. पश्चिम रेल्वेचा वैतरणा नदीवरील हा रेल्वे पूल १९७० मध्ये बांधण्यात आला होता. गुजराथ राज्यात उत्तरेत जाणाऱ्या मार्गावरचा हा महत्वाचा आणि एकमेव रेल्वे पूल आहे. त्याला अपघात घडल्यास मुंबईचा उर्वरित भारताशी असलेला संपर्कच संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे त्याची तातडीने काळजी घेणे आवश्यक आहे.>रेती उत्खनन आणि ट्रकची वाहतूक सुरुचवैतरणा खाडी आणि पूलाजवळ दररोज हजारो ब्रास रेतीचा उपसा केला जातो. त्यानंतर ट्रकने ही रेती मुंबईकडे रवाना केली जाते. विशेष म्हणजे सुर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर रेती उत्खनन आणि वाहतूकीला बंदी आहे. मात्र, यापरिसरात हा नियमही धाब्यावर बसवण्यात आला आहे. धक्कादाक बाब म्हणजे पूलाखालुन ट्रक वाहतूकीला बंदी असतानाही दररोज शेकडो ट्रक रेती वाहतूक करताना दिसतात. विशेष म्हणजे याठिकाणी असलेल्या दोन पूलावर रेल्वे, आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांची गस्त असते.कणेर पोलीस चौकी रेतीमाफियांचा अड्डावैतरणा पूलाला धोका पोचवणाऱ्या वाळू माफियांनी कणेर पोलीस चौकीच्या परिसरात आपला डेरा जमवला आहे. येथून रेती भरून येणारे ट्रक सहीसलामत मुंबई आणि परिसरात पोचवण्यासाठी रेतीमाफियांंची शेकडो माणसे मोटारसायकली आणि कार घेऊन कणेर पोलीस चौकीच्या परिसरात ठाण मांडून बसलेली असतात. वैतरणाहून आलेला ट्रक मोटार सायकल आणि कारच्या संरक्षणात मुंबईत सुखरूप पोचवण्याचे काम केले जाते.