शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नाझरे जलाशयात अत्यल्प पाणीसाठा

By admin | Updated: November 4, 2016 01:20 IST

वर्षीही जेजुरी परिसर, तसेच नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अत्यल्प राहिल्याने जलाशयातील पाणीसाठा अत्यल्प राहिला.

जेजुरी : या वर्षीही जेजुरी परिसर, तसेच नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अत्यल्प राहिल्याने जलाशयातील पाणीसाठा अत्यल्प राहिला. यामुळे या वर्षभरात पाण्याचे नियोजन आजपासूनच करणे आवश्यक आहे. अन्यथा तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पर्जन्यमान राहिल्याने या जलाशयात या वर्षी पाणीसाठा कमीच उपलब्ध झाला आहे. जलाशयात केवळ ४० टक्केच पाणीसाठा होऊ शकलेला आहे. आता पावसाळाही संपला असून, पावसाची शक्यताही राहिलेली नाही. यामुळे उपलब्ध पाणी वर्षभर वापरावे लागणार आहे. पूर्व पुरंदर आणि पश्चिम बारामती तालुक्यातील सुमारे सव्वालाख लोकसंख्येला वर्षभर पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पाण्याचे नियोजन आता गरजेचे बनलेले आहे. नाझरे जलाशयात केवळ ३२१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून, त्यातील १२२ दशलक्ष पाणीसाठा उपयुक्त मानला जातो. नाझरे जलाशयावरून मोरगाव व १६ गावे, पारगाव व २३ गावे, नाझरे व ५ गावे, जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, आई. एस. एम. टी. कंपनीसह सुमारे ५० गावे व वाड्यावस्त्या, त्याचबरोबर जलाशयावरील एकूण १७० शेती सिंचन योजना आणि पुरंदर तालुक्यातील १४०० हेक्टर आणि बारामती तालुक्यातील १७०० हेक्टर क्षेत्राला दोन आवर्तनाद्वारे शेतीलाही पाणीपुरवठा केला जातो. जलाशयाची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असल्याने हे शक्य होते. मात्र, जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेला नसल्याने आता शेतीला पाणीपुरवठा करणे शक्यच नाही. उपयुक्त पाणीसाठ्यातील एकूण ५० गावांना पिण्याचे पाणी दररोज बारा तास दिले जात असल्याने ते वर्षभर पुरवावे लागणार आहे. पूर्ण क्षमतेने जलाशय भरलेला असेल, तर शेती सिंचन योजनांना वर्षाकाठी ५० ते ६० दशलक्ष घनफूट व बारामती आणि पुरंदर तालुक्यातील ३१०० हेक्टरसाठी खरीप व रब्बी हंगाम आवर्तनाद्वारे १५० ते १८० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा दिला जातो. वर्षभरात साधारणपणे ८० ते १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन होते. उर्वरित पाण्यापैकी मृत साठा २०० दशलक्ष सोडून इतर पाणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना दिला जातो. अशी साधारण येथील नियोजनाची पद्धत आहे. यंदा मात्र पाणीसाठाच निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. (वार्ताहर)>नाझरे जलाशयावरून फक्त पिण्याच्याच पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. शेतीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. जलाशयावरील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा आणि जेजुरी व औद्योगिक क्षेत्रासाठीच पाणी राखण्यात आलेले आहे. शेतीसाठी पाणी दिले जाणार नसून, त्यासाठी महावितरणच्या सहकार्याने या परिसरातील वीजपुरवठा करणारे सर्व विद्युत जनित्र (डी. पी.) तील विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेल्या आहेत. यामुळे पाण्याची चोरीही होऊ शकणार नाही. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची गस्तही वाढवलेली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पावसाळ्यापर्यंत यंदा पिण्याच्या पाण्यासाठीच पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. - नीरज नागोसे, शाखाधिकारी, नाझरे जलाशय>या वर्षी जलाशयातील आजचा पाणीसाठा केवळ ३२२ दशलक्ष घनफूट आहे. पैकी २०० दशलक्ष घनफूट मृतसाठा वगळता केवळ १२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठाच उपयोगात आणावा लागणार आहे. त्या पाण्याचे नियोजन आतापासून न केल्यास उन्हाळ्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर राहणार आहे.