शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वाहने चोरणाऱ्या टोळीला अटक

By admin | Updated: July 20, 2016 02:51 IST

चारचाकी गाड्या भाड्याने देण्याचा बहाणा करून त्या परस्पर विकणाऱ्या टोळीतील चौघांना कामोठे पोलिसांनी अटक केली आहे.

पनवेल : चारचाकी गाड्या भाड्याने देण्याचा बहाणा करून त्या परस्पर विकणाऱ्या टोळीतील चौघांना कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ७३ लाखांच्या ३५ गाड्या हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकारामुळे कार चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. प्रवीण विजय खडकबाण व विश्वास मारु ती कदम यांनी खांदा वसाहतीत साई समर्थ टूर्स आणि ट्रॅव्हल्स या नावाने कार्यालय सुरू केले होते. या कार्यालयातून एक वर्षाच्या करारावर गाड्या भाड्याने देण्यात येत होत्या. गाड्यांचे करार करून महिन्याला ४० ते ४५ हजारांचे आमिष गाडी चालकाला दाखविले जात असे. महिन्याला भाडे मिळेल या लालसेपोटी गाडीमालक आपली कार भाड्याने देत असे. गाडी ताब्यात आल्यानंतर या टोळीकडून गाडीचे नंबर प्लेट बदलून, बनावट आरसी बुक व दस्तऐवज बनवून त्या गाड्यांची विक्र ी केली जायची. तसेच काही टी परमिट असलेल्या गाड्या खासगी केल्या जायच्या. मालकासोबत भाडे करार करून, नंतर खोटी कागदपत्रे बनवून गाडीची विक्र ी करणाऱ्या विकी दीपक गायकवाड (२५) कामोठे, विश्वास मारु ती कदम (२३) कामोठे, प्रवीण विजय खडकबाण (३५) खांदा वसाहत, मौसम आत्माराम पाटील (३३) भरोडी, भिवंडी यांना कामोठे पोलिसांनी जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्यांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून एकूण ३५ गाड्या हस्तगत केल्या असून आणखी कार लवकरच हस्तगत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली. या टोळीतील मंदार पाटील ऊर्फ सुशील महाडिक आणि नितीन डोंगरे हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.