शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ११ प्रादेशिक परिवहन कार्यालयांत वाहन तपासणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 05:45 IST

केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नाही.

मुंबई : केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत २५० मीटरचा ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध न केल्याने राज्यातील ११ प्रादेशिक परिवहन कार्यालयांत वाहन तपासणी बंद असल्याची माहिती मंगळवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली. मुंबईच्या चार कार्यालयांसह, ठाणे, वसई, बीड, सातारा, अकलूज, गोंदिया इत्यादी ठिकाणी वाहन तपासणी बंद असल्याचे राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले.

केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत राज्यातील सर्व आरटीओंमध्ये २५० मीटरचे ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्याचा आदेश उच्च न्यायालयानेराज्य सरकारला गेल्यावर्षी दिला. मात्र, भूखंड संपादित करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे असल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेशाची अंमलबजावणी करण्यास वारंवार मुदतवाढ दिली. मात्र, त्याही मुदतीत राज्य सरकारने ११ ठिकाणी २५० मीटरचे ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध न केल्याने राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आरटीओंमध्ये वाहन तपासणी बंद ठेवली आहे.

दरम्यान, वाहन तपासण्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित केला गेला. न्यायालयाने यापूर्वीच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे. मात्र, यावरही अंमलबजावणी न केल्याने उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले.वाहनांची तपासणी न करताच वाहनांना ‘फिटनेस सर्टिफिकीट’ देण्यात येते. आरटीओंमध्ये मोठा भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप करत पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कर्वे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने वरील निर्देश दिले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार