शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वाहन अग्रिमात वाढ!

By admin | Updated: August 30, 2014 00:11 IST

वेतन बँडमधील मासिक वेतनाच्या तीन ते नउ टक्कयांपर्यंत मिळणार अग्रीम, सरकारी कर्मचार्‍यांना सणासुदीची भेट.

संतोष मुंढेवाशिम: वाहन अग्रिमामध्ये राज्य घसघशीत वाढ करून राज्य सरकारने कर्मचार्‍यांना सणासुदीची भेट दिली आहे. ही वाढ मासिक वेतनाच्या तीन ते नऊ पट असून, त्यासंदर्भातील काही नियमही शिथिल करण्यात आले आहेत.वाहन अग्रिम रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव, बर्‍याच काळापासून शासनाच्या विचाराधीन होता. सरकारने नुकताच तसा निर्णय घेतला आणि वित्त विभागाने २0 ऑगस्ट २0१४ रोजी तसा शासन निर्णय (जीआर) जारी केला. ज्या कर्मचार्‍यांचे वेतन बॅँडमधील मासिक वेतन ८,५६0 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा कर्मचार्‍यांना मासिक वेतनाच्या नऊ पट, अथवा ७0 हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढी अग्रिम रक्कम अनुट्ठोय असेल. प्रथम अग्रिम रक्कम व त्यानंतर व्याज वसुली, या पध्दतीने या अग्रिमाची ६0 समान हप्त्यांमध्ये वसुली करण्यात येईल. स्कू टर खरेदीसाठी ग्रेड वेतन वगळता ८,५६0 रुपये मासिक वेतन असलेल्या कर्मचार्‍यांना, मासिक वेतनाच्या आठपट किंवा ६0 हजार यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढा अग्रिम अनुट्ठोय असेल. त्याची वसुली ४८ समान मासिक समान हप्त्यांमध्ये करण्यात येईल. नवीन मोपेड खरेदीसाठी, ग्रेड वेतन वगळता ८,५६0 रुपये मासिक वेतन असलेल्या कर्मचार्‍याला मासिक वेतनाच्या तीन पट किंवा २५ हजार रुपये यापेक्षा जी रक्कम कमी असेल, तेवढा अग्रिम मिळू शकेल. त्याची वसुली ३0 समान हप्त्यांमध्ये करण्यात येईल. ज्या कर्मचार्‍यांचे ग्रेड वेतन २,८00 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा अराजपत्रीत कर्मचार्‍यांना ३,५00 रुपये किंवा सायकलची प्रत्यक्ष किंमत यापेक्षा जी रक्कम कमी असेल तेवढा अग्रिम अनुट्ठोय राहील व त्याची वसुली १0 समान मासिक हप्त्यांमध्ये करण्यात येईल. अग्रिम घेण्यासाठी नियुक्तीनंतर किमान पाच वर्षांच्या सलग सेवेची अट आहे. दिनांक १ मे २00१ रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्या कर्मचार्‍यास दूसर्‍या वेळच्या जुळ्य़ा अपत्याचा अपवाद वगळता, अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही. अग्रिम मंजूरीपासून एक महिन्याच्या आत संबंधित कर्मचार्‍याला त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे शासनास सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसे न केल्यास अग्रिमाची रक्कम एक महिन्यानंतर व्याजासह एकरकमी वसूल करण्यात येईल. जुन्या गाड्यांसाठी अग्रिम देण्यात येणार नाही.