शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या-फळे एफडीएच्या रडारवर

By admin | Updated: January 7, 2015 01:38 IST

प्रदूषणाचा विळखा बसलेल्या मुंबईकरांना आता स्वच्छ भाज्या व फळे लवकरच उपलब्ध होणार आहेत़ यासाठी अन्न व औषध प्रशासन मोहीम हाती घेणार

पूजा दामले - मुंबईप्रदूषणाचा विळखा बसलेल्या मुंबईकरांना आता स्वच्छ भाज्या व फळे लवकरच उपलब्ध होणार आहेत़ यासाठी अन्न व औषध प्रशासन मोहीम हाती घेणार असून, मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी याद्वारे घेतली जाणार आहे़ त्यामुळे आधी मासे आणि आता भाज्या-फळेही एफडीएच्या रडारवर असणार आहेत. ताज्या, स्वच्छ, नैसर्गिकरीत्या पिकलेल्या भाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. पण बाजारात येणाऱ्या भाज्यांवर कोणती प्रक्रिया झालेली आहे का, त्या भाज्या कुठे ठेवल्या होत्या, याविषयी ग्राहकाला कोणतीच माहिती नसते. यामुळे ग्राहकांची फसवणूक होते आणि त्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत असतो. यापुढे ग्राहकांची अशाप्रकारे फसवणूक होऊ नये, म्हणूनच ‘अन्न साक्षरता व अन्न सुरक्षा महाअभियान’च्या पुढच्या टप्प्यात अन्न व औषध प्रशासन भाज्या आणि फळांवर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती प्रशासनाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली. काही भाज्यांना रंग लावले जातात, भाज्या चांगल्या दिसाव्यात म्हणून काही वेळा केमिकल्सचाही वापर केला जातो. भाज्यांच्या मोहिमेत आधी या प्रकारांकडे लक्ष देण्यात येणार आहे. यानंतर हळूहळू त्या कुठे ठेवल्या जातात, कुठून येतात, हे शोधले जाणार आहे. यात सर्व भाजी विक्रेत्यांचा समावेश करण्यात येईल. शेतकऱ्यांपर्यंत जाऊन तपासणी करणे, पुढे कुठे भाज्या ठेवल्या जातात, हे तपासणे इतके सर्व मनुष्यबळ कमी असल्यामुळे करणे सध्या शक्य नाही. ही संकल्पना अजून प्राथमिक स्वरूपात आहे, असे आयुक्त भापकर यांनी सांगितले. अन्न साक्षरता व अन्न सुरक्षा अभियान सुरू करण्याचा मुख्य उद्देश हा जनतेला शुद्ध, निर्भेळ अन्न आणि दूध मिळण्याचा अधिकार असून, त्यांना तो मिळवून दिला पाहिजे. यामुळे प्रशासन विक्रेत्यांवर कारवाई करीत आहे, असे भापकर यांनी सांगितले.अभियान सुरू झाल्यापासून भेसळयुक्त दुधावर एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये ९५ दूध नमुने तपासण्यात आले होते. यापैकी १० नमुने हे कमी दर्जाचे आढळले होते. यानंतर प्रशासनाने मासे विक्रेत्यांची नोंदणी आहे की नाही, याविषयी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम अंतिम टप्प्यात आल्यावर भाज्यांकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे.