शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने भाजीपाला महागला

By admin | Updated: June 20, 2016 04:10 IST

रोजच्या जेवणात आवश्यक असलेल्या डाळींबरोबरच भाजीपालाही महागल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरील भीषण संकट

प्राची सोनवणे,नवी मुंबईरोजच्या जेवणात आवश्यक असलेल्या डाळींबरोबरच भाजीपालाही महागल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरील भीषण संकट तसेच अत्यल्प पावसामुळे उत्पादन घटले आहे. वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारपेठेतही भाज्यांची आवक घटली असून आठवडाभरात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.पाणीटंचाईमुळे भाजीपाला उत्पादकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. वाढत्या दरांमुळे गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे. दोन आठवड्यांपूर्वी ५०० ते ५५० ट्रक आणि टेम्पोची आवक होत होती. या आठवड्यात सरासरी ३०० ते ३५० ट्रक आणि टेम्पोची आवक झाली आहे. टोमॅटोचे भाव दिवसागणिक वाढत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टोमॅटोचे भाव दुपटीने वाढले आहेत. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आवक घटल्याने आणि उत्पादनापेक्षा मागणी वाढत असल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ९० रुपये किलो दराने विकली जाणारी फरसबी सध्या ११० रुपये किलोने दराने उपलब्ध आहे. गवार ८० ते ९० रुपये, घेवडा १७० ते १८० रुपये, भेंडी ६० ते ७५ रुपये, दोडके १०० ते १२० रुपये, कोबी ४० ते ५०, फ्लॉवर ८० ते ९० रुपये, शेवग्याच्या शेंगा १०० ते १२० रुपये, तोंडली ६० ते ७० रुपये, वांगी ६० ते ७० रुपये, दुधी ७० ते ८० रुपये, कोथिंबीरची एक जुडी १० ते ३० रुपये तर पालेभाजीची एक जुडी २० ते ३० रुपये दराने विकली जात आहे. यंदा चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.