शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वीरपत्नीची निवृत्त वेतनासाठी न्यायालयात धाव

By admin | Updated: April 5, 2017 06:10 IST

कर्नाटकमध्ये मरण पावलेल्या सखाराम सूर्यवंशी यांच्या पत्नीची महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या ‘तू-तू, मै-मै’ मध्ये आबाळ झाली आहे

दीप्ती देशमुख,मुंबई- दुसऱ्या महायुद्धामध्ये भाग घेऊन त्यानंतर कर्नाटकमध्ये मरण पावलेल्या सखाराम सूर्यवंशी यांच्या पत्नीची महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या ‘तू-तू, मै-मै’ मध्ये आबाळ झाली आहे. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी तुळसाबाई उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह महाराष्ट्रात स्थिरावल्या. दोन्ही सरकारने जवानांसाठी असलेल्या निवृत्ती वेतनाच्या योजनेचा लाभ घेण्यास त्या अपात्र आहेत, असे म्हणत त्यांची जबाबदारी एकमेकांवर ढकलली आहे. २६ वर्षे दोन्ही सरकारची करुणा भाकूनही एकाही सरकारने मदत न केल्याने अखेर त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठवावे लागले.महाराष्ट्र सरकारला १९९० पासून १२ टक्के व्याजाने सेवानिवृत्त वेतन देण्याचा आदेश द्यावा, यासाठी वीरपत्नी तुळसाबाई सुर्यवंशी यांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १९४३ साली सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात सखाराम सूर्यवंशी सहभागी झाले. त्यानंतर मार्च १९४७ मध्ये त्यांची कर्तव्यातून निवृत्त करण्यात आले. त्यानंतर सखाराम ते कुटुंबासह कर्नाटकमधील बेळगावातील अथणी तालुक्यात राहू लागले. १९८५ मध्ये त्यांचे निधन झाले. दरम्यान महाराष्ट्र सरकारने दुसऱ्या महायुद्धातील वीरपत्नीांसाठी निवृत्ती वेतन योजना सुरू केली. त्यासाठी तुळसाबाई यांनी केंद्र सरकारशीही पत्रव्यवहार केला. त्यांना ‘रक्षामंत्रालय स्वेच्छा निधी’ मधून ३० हजार रुपयांची मदत करण्यात आली. मात्र ही मदत पहिली व शेवटची ठरली. निवृत्ती वेतन मिळावे, यासाठी गेली २६ वर्षे त्या लढा देत आहेत. (प्रतिनिधी) >दोन्ही सरकारने जबाबदारी ढकललीमहाराष्ट्र सरकारने दुसऱ्या महायुद्धातील वीरपत्नींना आर्थिक मदतीसाठी निवृत्ती वेतनाची योजना काढल्यानंतर तुळसाबाई यांनी वेतन मिळावे, यासाठी राज्य सरकारकडे अर्ज केला. मात्र त्यांचे पती निवृत्त झाल्यानंतर कर्नाटकमध्ये राहिल्याने व महाराष्ट्रात १५ वर्षांचा अधिवास पूर्ण न केल्याने सरकारने त्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यास नकार दिला. त्यानंतर तुळसाबाई यांनी निवृत्ती वेतन मिळावे, यासाठी कर्नाटक सरकारकडे अर्ज केला. मात्र कर्नाटक सरकारनेही त्या सध्या महाराष्ट्रात राहात असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही, असे स्पष्ट सांगितले.