शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात; पुणे अन् मराठवाड्यातील ३० प्रवासी गंभीर जखमी
2
Raja Raghuvanshi : मर्डर मिस्ट्री! "ट्री कटरने हत्या...", राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; पत्नी बेपत्ता
3
Bengaluru Stampede : "काहींना पास मिळाला, गेट उघडताच..."; चेंगराचेंगरीचं कारण समोर, लोकांनी सांगितलं काय घडलं?
4
'भारतात या, एकत्र सेलिब्रेट करू,' RCB च्या विजयाच्या पोस्टनंतर स्टेट बँकेनं मल्ल्याची उडवली खिल्ली
5
ज्येष्ठ निर्जला एकादशी: एकदाच व्रत करा, २४ एकादशींचे पुण्य मिळवा; पाहा, महात्म्य अन् मान्यता
6
"कुंभमेळ्यात ६० लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा मी..."; बंगळुरुतल्या चेंगराचेंगरीवर CM सिद्धरामय्यांचे वक्तव्य
7
भारतानं चुपचाप टाकले आपले पत्ते, चीनचं वाढणार टेन्शन; टॅरिफवरील ही भविष्यवाणी समजून घ्या
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाही, ७ देशांवरही कडक निर्बंध
9
राजेंद्र दर्डा यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठित ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान
10
ज्येष्ठ निर्जला एकादशी: १ शुभ, १ अशुभ योग; ७ राशींची चंगळ, लक्ष्मी कृपेने धनलाभ, भरभराट काळ!
11
'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र'अंतर्गत यंदा राज्यात १० कोटी वृक्ष लावणार: मुख्यमंत्री
12
मंत्र्यांच्या आयपॅडसाठी १ कोटी ६ लाख; शासनाच्या ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खर्च
13
तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते
14
पूररेषेच्या आतील अतिक्रमणे रोखा, सर्व्हेक्षणात अचूकतेसाठी उपग्रहाद्वारे मॅपिंग करा- मुख्यमंत्री
15
स्टाफ नर्स घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव! पैसे घेतात अन् मुंबईत संबंधित कागदपत्रे तपासतात
16
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
17
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
18
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
19
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
20
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला

वासुदेव कामत यांचा अमेरिकेत सन्मान

By admin | Updated: May 8, 2016 03:44 IST

जागतिक ख्यातीचे भारतीय चित्रकार वासुदेव कामत यांना पोर्ट्रेट सोसायटी आॅफ अमेरिका या संस्थेने सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप हा पुरस्कार दिला असून, हा मोठाच गौरव मानला जातो.

मुंबई : जागतिक ख्यातीचे भारतीय चित्रकार वासुदेव कामत यांना पोर्ट्रेट सोसायटी आॅफ अमेरिका या संस्थेने सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप हा पुरस्कार दिला असून, हा मोठाच गौरव मानला जातो. जे चित्रकार पोर्ट्रेट पेंटर म्हणून अविरतपणे निर्मिती करीत आहेत, या विषयाचे प्रशिक्षण देत आहेत, अशांना पोर्ट्रेट सोसायटी आॅफ अमेरिकेतर्फे सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप हा पुरस्कार देण्यात येतो.चित्र व शिल्पकला क्षेत्रात पोर्ट्रेटला प्रोत्साहन देणारी ही आंतरराष्ट्रीय संस्था असून, जगभरातील अनेक नामवंत पेंटर्स या संस्थेचे सभासद आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या या संस्थेच्या परिषदेत जगातील ७00 ते ८00 कलाकार सहभागी होत असतात. त्यातील आंतरराष्ट्रीय पोर्ट्रेट स्पर्धेतही हजारो कलाकारांचा सहभाग असतो. त्यातील अंतिम विजेत्यांची चित्रे प्रदर्शनात प्रदर्शित केली जातात. कामत यांच्या माय वाइफ या पोर्ट्रेटला २00६ साली ड्रेपर ग्रँड प्राइझ या पुरस्काराने गौरवले होते. यंदा एप्रिलमध्ये झालेल्या परिषदेत त्यांना सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप या पुरस्काराने गौरविले.