शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

आॅलिम्पिकवीर घडविणारा वस्ताद पाच बाय सहाच्या खोलीत

By admin | Updated: April 3, 2015 00:38 IST

गजानन गवळी यांची परवड : मानधनासाठी पंधरा वर्षांपासून धडपड

सचिन भोसले - कोल्हापूर -टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले बंडा पाटील, डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार अशा अनेक कुस्तीगीरांना घडविणारे काळाईमाम तालमीचे ८९ वर्षीय वस्ताद गजानन गवळी यांचे वयोवृद्ध मानधन मिळावे म्हणून गेली पंधरा वर्षे शासनदरबारी हेलपाटे सुरू आहेत. सध्या ते शनिवार पेठ येथील लोणार गल्लीतील पाच बाय सहाच्या खोलीत जीवन कंठत आहेत. आर्थिक पाठबळ नसल्याने व शासनाच्या दुर्लक्षामुळे कुस्तीसाठी हयात घालविणाऱ्या वस्ताद गवळी यांची वृद्धपणी परवड सुरू आहे.  चाळीस वर्षांहून अधिक काळ काळाईमाम तालीम येथे अनेक कुस्तीगीर घडविण्याचे काम गजानन गवळी यांनी केले. ते एकोणनव्वद वर्षांचे असून, सध्या ते पाच बाय सहाच्या खोलीत राहत आहेत. शासनाने आपल्याला वयोवृद्ध मानधन सुरू करावे म्हणून ते शासनदरबारी फेऱ्या मारीत आहेत. प्रत्येकवेळी काही ना काही कारण काढून त्यांचा प्रस्ताव फेटाळला जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी घडविलेल्या कुस्तीगीरांना मात्र वयोवृद्ध कुस्तीगीरांचे मानधन सुरू झाले आहे. ते आजही सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत व दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत काळाईमाम तालीम येथे येऊन बसतात. वृद्धापकाळात शासनाकडून मानधन मिळाले तर बरे होईल, ही आशा ठेवून त्यांनी ‘लोकमत’ ला आपली व्यथा सांगितली. आताच्या शासनकर्त्यांनी तरी माझ्या कार्याची दखल घेऊन मला मानधन सुरू करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. गवळी वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले मल्ल १९६४ चे टोकिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे बंडा पाटील (रेठरे), खासदार व हिंदकेसरी मारुती माने, डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण माने, सादिक पंजाबी, बिल्ला पंजाबी, विष्णू माने, नारायण माने, रामा माने, केशव पाटील-भेडसगावकर, रंगा कळंत्रे, शिवाजी बडस्कर, बाजीराव कळंत्रे, शिवा चौधरी, नामदेव पांडेकर, विश्वास नलवडे, मानसिंग जगताप, पांडुरंग सावर्डेकर, मल्लू माळी, अहमद पैलवान, कलाप्पा शिराळे. मी श्रीपती चव्हाण, महादेव हंडे, इब्राहिम पटेल, गणपती बिरंजे, रामचंद्र लोणारी, लक्ष्मण गवळी, म्हामूलाल वस्ताद अशा दिग्गजांकडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून कुस्तीचे धडे घेतले. आॅलिम्पिकसह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर तयार केले आहेत. यापूर्वी मी शिवछत्रपती पुरस्कारासाठीही प्रस्ताव दिला होता. पुरस्कार राहू दे; निदान मला माझा चरितार्थ चालविण्यासाठी मानधन तरी शासनाने द्यावे. - गजानन गवळी, ज्येष्ठ कुस्ती मार्गदर्शक