पुणे : ‘प्रभात’ फिल्म कंपनीनिर्मित ‘संत तुकाराम’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटात संत तुकारामांच्या मुलाची - महादूची- भूमिका साकारणारे पंडित तथा वसंत विष्णुपंत दामले यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.‘प्रभात’च्या इतर चित्रपटांतही त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. प्रभातच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे ‘प्रभात समयो पातला’ या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले होते. पहिल्या प्रभात पुरस्कारांच्या वेळी त्यांना ‘प्रभातचे शिलेदार’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते स्वत: उत्तम अभियंते होते.
‘प्रभात’चे शिलेदार वसंत दामले यांचे पुण्यात निधन
By admin | Updated: February 19, 2015 02:03 IST