शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वसई-विरारला पावसाने झोडपले

By admin | Updated: July 2, 2016 03:27 IST

रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने वसईला अक्षरश: झोडपून काढले.

वसई : रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने वसईला अक्षरश: झोडपून काढले. नालासोपारा शहरात ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर नवघर पूर्वेकडील मीठागर पाड्याला पाण्याने चारीबाजूने वेढल्याने तेथील संपर्क तुटला होता. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने लोकांना दिलासा मिळाला.रात्री धो-धो कोसळत असलेल्या पावसाने वसईतील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत केले होते. पावसाचा मोठा फटका नालासोपारा शहराला बसला. शहरातील रेल्वे उड्डाणपूलाखालून तीनही ठिकाणी जाणारे मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले. मुख्य रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याचबरोबर आचोळे, तुळींज आदी परिसरातही पाणी तुंबून राहिले होते. तर सोपारा गाव ते देसाई वाडी दरम्यान पाणी तुंबल्याने तेथील लोकांचे हाल झाले होते. वसई रोड येथील नवघर पूर्वेकडे असलेल्या मीठागर पाड्या शेजारील खाडीला पूर आल्याने येथील लोकांचा संपर्क तुटला होता. कमरेइतके पाणी साचून राहिल्याने दीडशे कुटुंबे अडकून पडली होती. पूर ओसरला नाही आणि पावसाचा जोर कायम राहिल्यास येथील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. वसई रोड रेल्वे स्टेशनलगत पश्चिमेकडील नवघर एसटी स्टँडमध्ये आज गुडघाभर पाणी साचून राहिल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. वसई पश्चिमेकडील काही गावांमध्येही पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने लोकांना दिलासा मिळाला.>इमारतीचा पाया कोसळलाविरार : सतत पहणाऱ्या मुसळधार पावसाने विरार मध्ये न्यू मोरेश्वर नगर या चार मजली इमारतीचा पाया कोसळला. विरार पूर्व फुलपाडा रोड न्यू मोरेश्वर नगर येथे २० फूट खोल नाल्यावरच ही अनाधिकृत इमारत बांधण्यात आली आहे. नाल्याच्या बाजूचा पाया आणि संरक्षण भिंत कोसळल्याने येथील २९ कुटुंबे संकटात सापडली आहेत. >पूरस्थितीमुळेभातरोपे वाया पारोळ/वसई : वसई पूर्व भागात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने तानसा, तुंबाडी या नद्या व जंगलातील नाले भरून वाहू लागल्याने जमीन पाण्याखाली जाऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नवजात भातरोप पायाखाली गेल्याने वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट वसई पूर्व भागातील शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे.>केळीच्या झाडांचे नुकसान वसई : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने वसई तालुक्यातील पश्चिम पट्टङ्मातील बागायती क्षेत्राचे मोठे नुकसान केले. येथील केळीच्या अनेक बागा उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वसई तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी तीन हजार ५०० हेक्टर बागायती शेतीचे क्षेत्र आहे. गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे केळीच्या बागा या काही प्रमाणावर उद्वस्त झाल्या आहेत. वसईची पश्चिम किनार पट्टी नारळ, केळीच्या बागांसाठी प्रसिध्द आहे. बनकेळी, वेलची केळी, भूर केळी अशा विविध प्रकारच्या केळींची लागवड पश्चिम किनारपट्टीवर होते. परंतु गेल्या काही दिवसापासून पडलेल्या पावसामुळे खोचीवडे, भुईगाव, रानगाव, कळंब, राजोडी, निर्मळ या ठिकाणच्या केळी आडव्या झाल्या आहेत. त्यामुुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.