शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाची सलामी! मंडपात मूर्ती विराजमान, पावसामुळे सोहळ्याचा मुहुर्त हुकला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 05:04 IST

गेल्या पंधरवड्यापासून दडी मारलेल्या वरुणराजाने शनिवार व रविवारी बाप्पाच्या आगमन सोहळ्यांत जोरदार सलामी दिली. पावसामुळे सर्वच मंडळांच्या आगमन सोहळ्यांचा मुहूर्त हुकला. मात्र तसूभरही उत्साह कमी होऊ न देता, ढोलताशांच्या आवाजत नाचत-गाजतच रविवारी सर्व मंडळांनी लाडक्या बाप्पाला मंडपांमध्ये विराजमान केले.

मुंबई : गेल्या पंधरवड्यापासून दडी मारलेल्या वरुणराजाने शनिवार व रविवारी बाप्पाच्या आगमन सोहळ्यांत जोरदार सलामी दिली. पावसामुळे सर्वच मंडळांच्या आगमन सोहळ्यांचा मुहूर्त हुकला. मात्र तसूभरही उत्साह कमी होऊ न देता, ढोलताशांच्या आवाजत नाचत-गाजतच रविवारी सर्व मंडळांनी लाडक्या बाप्पाला मंडपांमध्ये विराजमान केले.गणेश चतुर्थीदिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी बहुतेक मंडळांकडून चतुर्थीआधीच्या रविवारीच आगमन सोहळ्यांचे आयोजन केले जाते. सुट्टीचा मुहूर्त साधत सुमारे ५०हून अधिक मंडळांनी लालबाग, परळ येथील गणेश कार्यशाळांतून आगमन सोहळ्यांचे आयोजन रविवारी केले होते. मात्र सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने गणेशक्तांसह कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. बहुतेक मंडळांनी सकाळ व दुपारच्या मुहूर्तावर पाणी सोडत सायंकाळी पाऊस उघडण्याची वाट पाहण्यातच धन्यता मानली. याउलट दुपारी ओस पडलेल्या रस्त्यांचा फायदा घेत काही मंडळांनी धूमधडाक्यातच बाप्पाचा आगमन सोहळा पार पाडला.काळाचौकी येथील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाने या वेळी विशेष लक्ष वेधले. नऊवारी साडी नेसलेल्या महिला कार्यखर्त्या, तर गुलाबी रंगांच्या फेट्यांसह जॅकेच्या आतून सदरा व लेंगा घातलेले पुरुष कार्यकर्ते भलतेच भाव खाऊन गेले. मूर्तीवर प्लॅस्टिक टाकून मुंबादेवीच्या राजापासून असल्फाचा लाडका अशा विविध मंडळांनी बाप्पाची स्वारी काढली. भरपावसातही ढोल-ताशांच्या आवाजात गणेशभक्त नाचण्यात दंग झाले होते.वालधुनीची धोक्याची पातळीउल्हासनगर : संततधार पावसामुळे वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. तसेच उल्हासनगर शहरातील अनेक सखल भागांत साचलेले पाणी ते घरांमध्ये शिरले होते. संततधारेने त्रेधातिरपीटकल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार रविवारीही कायम होती. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. चौक जलमय झाल्याने, रस्त्यांतील खड्ड्यांमुळे वाहतुकीला फटका बसला.अकरा ठिकाणी झाडे पडली मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात एका ठिकाणी भिंतीचा भाग पडल्याची घटना घडली. शहरात सहा ठिकाणी, पूर्व उपनगरात एक अशा सात ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात तीन, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात सहा अशा एकूण अकरा ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनांत हानी झाली नाही.मुंबई शहरात भायखळा, दादर, धारावी, पूर्व उपनगरात चेंबूर, गवाणपाडा, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, पश्चिम उपनगरात मरोळ, मालाड, गोरेगाव, दहिसर, दिंडोशी, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल आणि बोरीवली येथे पावसाची अधिक नोंद झाली.२१ आॅगस्ट रोजी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २२ आॅगस्ट रोजी गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार, दक्षिण-पूर्व विदर्भ आणि लगतच्या भागावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.मुंबई-गोवा महामार्गावर साचले पाणीशनिवारी पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर मार्गावर पाणी साचले होते. कल्हे गावाजवळ रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे महामागावरील एक लेन पाण्यात गेली होती. रविवारी हीच परिस्थिती कायम होती. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने या मार्गावर सुरु होती.