शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विविध विकासकामांचा आज होणार शुभारंभ

By admin | Updated: June 9, 2016 03:31 IST

टोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा ९ जून रोजी पार पडणार आहे.

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा ९ जून रोजी पार पडणार आहे. रायगड जिल्हा परिषद, नेरळ विकास प्राधिकरण आणि नेरळ ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे. याप्रसंगी कर्जतचे आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, कर्जत पंचायत समिती सभापती सुवर्णा बांगारे, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सुदाम पेमारे, पूजा थोरवे, एकनाथ धुळे, नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा नाईक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सकाळी १०.३० वा. राजमाता जिजाऊ भोसले तलावाच्या सुशोभीकरण कामाचे लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. कुंभार आळी व दगडी शाळा नवीन इमारतीचे भूमिपूजन स. १०.४५ वा. मटण व मच्छिमार्केट नूतनीकरण स. ११ वा. टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या कार्यालयाचे भूमिपूजन, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन, अवजड वाहने नेरळच्या बाहेरून जाण्यासाठी विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरण, नेरळ कन्या शाळेच्या चार खोल्यांच्या इमारतीचे भूमिपूजन, विश्रामगृहासह व्यापारी संकुल इमारतीचे भूमिपूजन असे भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहेत. या विविध विकासकामांमुळे नेरळमध्ये विकासाची गंगा अवतरल्याची अनुभूती होणार आहे. (प्रतिनिधी)