शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विलेपार्ल्यातील ‘पारले’ कारखाना इतिहासजमा

By admin | Updated: July 28, 2016 03:18 IST

चर्चगेटहून विलेपार्लेला जाताना ‘पारले-जी’च्या बिस्किटांच्या सुवासावरून विलेपार्ले स्थानक आल्याचे प्रवाशांना समजायचे. अनेक जण ट्रेनमधून प्रवास करताना नवख्या मुंबईकराला

मुंबई : चर्चगेटहून विलेपार्लेला जाताना ‘पारले-जी’च्या बिस्किटांच्या सुवासावरून विलेपार्ले स्थानक आल्याचे प्रवाशांना समजायचे. अनेक जण ट्रेनमधून प्रवास करताना नवख्या मुंबईकराला आवर्जून ‘पारले-जी’ बिस्कीट कारखाना दाखवायचे. पण यापुढे हे सर्व इतिहासजमा होणार आहे. कारण, हा कारखाना बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. विलेपार्ले येथील कारखान्यातील उत्पादन क्षमता कमी झाल्यामुळे कारखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.पारले कंपनीची एकूण उलाढाल ही दहा हजार कोटींच्या घरात आहे. देशभरात विविध ठिकाणी पारलेचे उत्पादन केले जाते. विलेपार्ले येथील कारखाना १९२९ साली सुरू करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात या कारखान्यात फक्त कॅण्डीचे उत्पादन केले जायचे. १९३९ नंतर या कारखान्यात बिस्किट बनवण्यास सुरुवात केली होती. ‘पारले-जी’ या बिस्किटांना इतकी वर्षे उलटूनही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.विलेपार्ल्याच्या कारखान्यातील उत्पादन घटले होते. अशा स्थितीत हा कारखाना सुरू ठेवणे व्यावसायिकदृष्ट्या शहाणपणाचे नाही. त्यामुळे येथील उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्यात शेवटपर्यंत असलेल्या ३०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे पारले उत्पादनांचे कार्यकारी संचालक अरूप चौहान यांनी सांगितले. मुंबईत विविध ठिकाणांची ओळख तिथल्या वास्तूंमुळे आहे. जुन्या मुंबईच्या आठवणींना उजाळा देताना या वास्तूंचा उल्लेख नक्कीच केला जातो. त्याचप्रमाणे विलेपार्लेची एक ओळख म्हणून गेल्या ७७ वर्षांपासून ‘पारले-जी’चा कारखाना उभा होता. याच्या आसपासच्या परिसरातून जाताना बिस्किटाच्या सुवासाने अनेकांची मने मोहून जात. वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईच्या जुन्या खुणा पुसल्या जात आहेत. हा कारखाना बंद झाल्यावरही मुंबईतील एका वास्तूची खूण पुसट होणार आहे. पारलेचा कारखाना बंद होणार ही बातमी पार्ल्यात पसरल्यानंतर पार्लेकरांनी खेद व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)३00 कर्मचाऱ्यांनी स्वीकारली स्वेच्छानिवृत्ती- विलेपार्ल्याच्या कारखान्यातील उत्पादन घटले होते. अशा स्थितीत हा कारखाना सुरू ठेवणे व्यावसायिकदृष्ट्या शहाणपणाचे नाही. त्यामुळे येथील उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. - कारखान्यात शेवटपर्यंत असलेल्या ३०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे पारले उत्पादनांचे कार्यकारी संचालक अरूप चौहान यांनी सांगितले.