शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वांद्र्यातील प्र्रचाराच्या तोफा थंडावल्या

By admin | Updated: April 10, 2015 08:42 IST

आरोप-प्रत्यारोप आणि दिग्गज राजकारण्यांच्या सभांनी रंगत भरलेल्या वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक प्रचाराच्या

मुंबई : आरोप-प्रत्यारोप आणि दिग्गज राजकारण्यांच्या सभांनी रंगत भरलेल्या वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावल्या. अखेरच्या दिवशी महायुती व कॉँग्रेसच्या उमेदवारांनी भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या शनिवारी (दि. ११) मतदान होत आहे. सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत, कॉँग्रेसचे नारायण राणे व एमआयएमचे रहबर खान या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होत आहे. उघड प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून जोरदार प्रचार केला. तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. सकाळी साडे दहाच्या सुमारास मातोश्री परिसरातून रॅलीला सुरुवात झाली. त्यांच्यासमवेत राज्यमंत्री रवींद्र वायकर, सेनेचे सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते. रॅलीत आजी-माजी विभागप्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते. कलानगर, वांद्रे वसाहत, गव्हर्नमेंट कॉलनी, चेतना कॉलेज मार्गे खेतवाडीतील शाखेजवळ दुपारी २च्या सुमारास रोड शोची सांगता झाली. भगवे झेंडे, टोप्या, मफलरी, भगव्या साड्यांतील महिला कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार राणे यांच्या समर्थकांत मुंबईतील सर्व प्रमुख कॉँग्रेस नेत्यांनी यात्रा काढली. खेतनगरातील पक्षाच्या मुख्य कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, प्रदेश सहप्रभारी सोयराज वाल्मीकी, बाला बच्चन, प्रिया दत्त, आमदार कालिदास कोळंबकर, अस्लम शेख, नसीम खान, माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह, माजी मंत्री सचिन अहिर, बलदेव खोसा, अशोक जाधव आदी सहभागी होते. त्यामध्ये सुरुवातीला माजी खासदार नीलेश राणेंसह अन्य युवक कार्यकर्ते मोटारसायकल घेऊन सहभागी झाले होते. मतदारसंघातील प्रमुख मार्गावरून फिरून ३ वाजण्याच्या सुमारास रॅलीची सांगता झाली. त्यानंतर सायंकाळी संजय निरुपम यांनी प्रचारसभा घेत प्रचाराची सांगता केली. एमआयएमच्या उमेदवार रहबर खान यांच्या प्रचारासाठी पक्षाचे आमदार वारिस पठाण, अध्यक्ष महंमद पठणी यांनी भारतनगर, बहेराम पाड्यात सभा घेतल्या. (प्रतिनिधी)