आळंदी : अभंग म्हणत आणि मुखाने ‘ज्ञानोबा-तुकाराम’नामाचा जयघोष करीत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेले लाखो वारकरी ८० दिंड्यांसह आळंदीत दाखल झाले आहेत. तर, संत नामदेव महाराजांच्या पादुकाही सुमारे पाच हजार वारकऱ्यांसह दाखल झाल्या आहेत. वारकऱ्यांची लगबग, धर्मशाळेतून कानाला ऐकू येणारा हरिनामाचा गजर, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन व प्रवचनांचे कार्यक्रम होताना दिसून येत आहेत. सोमवारी कार्तिकी एकादशी असून, लाखोंच्या संख्येने दाखल झालेल्या भाविक व वारकऱ्यांना दर्शनाची कसलीच अडचण होणार नाही, या दृष्टीने मंदिर प्रशासन व देवस्थान कमिटी विशेष प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)
आळंदीत जमली वैष्णवांची मांदियाळी
By admin | Updated: December 6, 2015 02:00 IST