शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

...तेव्हा कळली न्यूज व्हॅल्यूची किंमत - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 09:55 IST

सकाळी संसदपटू पुरस्कार मिळाल्यानंतर दुपारी विदर्भावर केलेलं वक्तव्य महागात पडलं, आणि भलत्याच हेडलाईन छापून आल्या असं सांगत त्यादिवशी न्यूज व्हॅल्यूची किंमत कळली.

ऑनलाइन लोकमत - 

मुंबई, दि. 03 -  सकाळी संसदपटू पुरस्कार मिळाल्यानंतर दुपारी विदर्भावर केलेलं वक्तव्य महागात पडलं, आणि भलत्याच हेडलाईन छापून आल्या असं सांगत त्यादिवशी न्यूज व्हॅल्यूची किंमत कळली अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्यात सांगितली. 2003-04 या वर्षी देवेंद्र फडणवीस यांना उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कारने गौरवण्यात आलं होतं. त्याचदिवशी दुपारी बोलण्याच्या नादात त्यांनी विदर्भ विरोधकांना म्हणजेच अखंड महाराष्ट्रवाद्यांना चालते व्हा असं म्हटलं, त्याचभरात चूक झालीये पण माफी मागणार नाही असंही म्हणत फडणवीस ठाम राहिले. ही आठवण सांगताना फडणवीस म्हणाले की दुस-या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांनी पुरस्काराची बातमी सोयीस्करपणे बाजूला ठेवत केवळ दुपारचा किस्सा रंगवून सांगितला, आणि त्यादिवशी न्यूज व्हॅल्यू म्हणजे काय ? हे मला कळालं असं फडणवीस बोलले आहेत. 
 
जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये आहे. महाराष्ट्रात जात पंचायत विरोधी कायदा दोन्ही सभागृहात मंजूर झाला. त्यातून लक्षात येते की वाद अनेक आहेत, पण लोकशाहीत ताकद आहे आणि एकत्र येऊन चांगले काम होऊ शकते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. विधान मंडळ दर्जा चांगला हवा असेल तर या पुरस्कारांच्या माध्यमातून लोकांनी सांगितलं पाहिजे आम्ही काम करणाऱ्याच्या पाठी आहोत असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.
 
विधानसभा सुरु असताना एक सकारात्मक बातमी नक्की द्या, यामुळे लोकशाही प्रगल्भ होईल असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना केलं आहे.
 
संसदीय कार्याच्या माध्यमातून देशाचे, समाजाचे कल्याण आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना वास्तवात आणण्याचे काम होते. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काळात संसद असो की, देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे, असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. समाजधुरिणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले.