शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यव्यवस्था हाच समाजव्यवस्थेचा आधार

By admin | Updated: August 22, 2015 23:29 IST

समाजव्यवस्थेत अनेक उपव्यवस्था असतात़ या सर्वांचा आधार मूल्यव्यवस्था आहे़ मूल्यांचा ऱ्हास झाला तर व्यवस्था कोलमडून जाईल, असे मत ज्येष्ठ तत्वज्ञ डॉ़ सदानंद मोरे

अहमदनगर : समाजव्यवस्थेत अनेक उपव्यवस्था असतात़ या सर्वांचा आधार मूल्यव्यवस्था आहे़ मूल्यांचा ऱ्हास झाला तर व्यवस्था कोलमडून जाईल, असे मत ज्येष्ठ तत्वज्ञ डॉ़ सदानंद मोरे यांनी व्यक्त केले़ न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात तत्वज्ञान विभागाच्यावतीने ‘मानवी मूल्य आणि आधुनिक समाज’या विषयावर शुक्रवारी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ मोरे म्हणाले की,मानवी इतिहासाचा मूल्यात्मक आढावा घेताना इतिहासाचा प्रत्येक टप्पा हा मूल्यसंघर्षच होता़ मूल्य ही मानवनिर्मित आहेत़ ते दैवी नाहीत़ मूल्यसंघर्ष हा मानवी जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे़ यातूनच नवीन मूल्य निर्माण होत असतात़ काही मूल्यामध्ये बदल हवा असतो़ तर काहींना हा बदल नको असतो़ मूल्य मात्र, कधी संपत नाहीत़ मूल्यविरहीत समाज असूच शकत नाही़ मूल्य व्यवस्था ढासळली तर समाजव्यवस्था धोक्यात येईल असे ते म्हणाले़ प्राचार्य डॉ़ बी़एच़ झावरे यांनी विज्ञान व मूल्यव्यवस्था यांनी हातात हात घालून काम केले तर मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल असे सांगितले़ सीताराम खिलारी म्हणाले, जीवन जगत असताना आपण बरोबर की, चूक हे ठरवताना मूल्य हीच मोजपट्टी आहे़ प्रत्येकाने मूल्य संभाळून व्यवहार केला तर समाज व्यवस्थित राहिल़ तत्वज्ञान विभागप्रमुख प्रा़ अमन बगाडे यांनी प्रास्ताविक केले़ या चर्चासत्रात हैद्राबाद विद्यापीठातील प्रा़ वेंकट रेड्डी, बनारस विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागप्रमुख डॉ़ प्रदीप गोखले यांनी आपल्या विषयांचे सादरीकरण केले़ शनिवारी डॉ़ पेन्ना मधुसूदन, डॉ़ हेमा मोरे, डॉ़ लता चित्रे, डॉ़विजय कांची, डॉ़ शुभदा जोशी, डॉ़ ज़रा़ दाभोळकर व डॉ़ राहुल वर्मा हे विचार व्यक्त करणार आहेत़ यावेळी प्रा़ सुभाष कडलग, प्रा़ काशीद, प्रा़ मीना साळे, प्रा़ अशोक चोथे,डॉ़ बाळासाहेब सागडे, डॉ़ जयश्री आहेर, प्रा़ नागेश शेळके, डॉ़ पी़टी़ शेळके, डॉ़ बी़डी़ उंदरे, डॉ़ बाळासाहेब पवार, प्रा़ गणेश भगत आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)