शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाइन ट्रेंड्स!

By admin | Updated: February 13, 2016 22:33 IST

व्हॅलेंटाइन डेला हटके दिसायला तरुणाईला आवडते. कपड्यांपासून ते चपलांपर्यंत सगळे कसे अप-टू-डेट हवे असते. त्यामुळे मुंबईतील अनेक शॉपिंग डेस्टिनेशन्स तरुणाईने

व्हॅलेंटाइन डेला हटके दिसायला तरुणाईला आवडते. कपड्यांपासून ते चपलांपर्यंत सगळे कसे अप-टू-डेट हवे असते. त्यामुळे मुंबईतील अनेक शॉपिंग डेस्टिनेशन्स तरुणाईने बहरून गेली आहेत. दरवर्षी वेगवेगळे ट्रेंड येतात आणि त्यांना तरुणाई फॉलो करते. याच ट्रेंडवर एक नजर....मॉलही ‘व्हॅलेंटाइनमय’शहर आणि उपनगरातील मॉल्स व्हॅलेंटाइनच्या रंगात रंगले आहेत. मॉल डेकोरेशनबरोबरच अधिकाधिक जोडप्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शॉपिंग स्कीम आणि मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन केले आहे. यात अनेक कपल्सना आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत.‘कॅज्युअल लूक’ला पसंतीयंदा कुल अटायरला तरुणाईची पसंती आहे. मुलींमध्ये कॅज्युअल लूकचे वनपीस, मॅक्सी ड्रेस, कॉटन स्कर्ट, क्रॉप टॉप्स, स्लिट टॉप्स, जेगिंग्ज, हाय वेस्टेड पॅन्टस असे काही प्रकार आवर्जून खरेदी केले जात आहेत; शिवाय त्यावर शोभतील अशा हेवी दिसणाऱ्या चोकरसेट, लॉग चेन विथ पेंडटला पसंती दिली जात आहे. तर पुरुषांमध्ये लाईट कलर टी-शर्ट आणि जॅकेटची मागणी आहे.पॅम्परिंगएक दिवस पॅम्पर करून घ्यायला अनेकांना आवडते. ही आवड लक्षात घेऊन अनेक पार्लरमध्ये कपल्ससाठी काही खास ब्युटी आॅफर्स ठेवल्या आहेत. मेनिक्युअर, पेडिक्युअर ते अगदी त्या दिवशी तुम्हाला खास लूक देण्यासाठी अनेक पार्लर्सनी चांगल्या आॅफर्सही व्हॅलेंटाइन वीकसाठी ठेवल्या आहेत. या आॅफर्स ५०० रुपयांपासून आहेत. ‘मिनीआॅन्स’ कार्टून्सची चलतीमिनीआॅन्स या कार्टून चित्रपटाची क्रेझ अजूनही आहे. बाजारात अनेक ठिकाणी मिनीआॅन्सचे पेडेंट, किचेन, सॉफ्ट टॉईज उपलब्ध आहेत. कार्टून आवडणाऱ्यांना गिफ्टसाठी हा चांगला पर्याय आहे. यांच्या किमती साधारण २०० रुपयांपासून पुढे आहेत.कुटुंबासाठीही खास आॅफर्सहल्ली व्हॅलेंटाइन जोडप्यांपुरता मर्यादित राहिला नाही तर तो आता सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन साजरा करायचा दिवस झाला आहे. त्यामुळे या दिवशी हॉटेलिंग आणि वन-डे टूरसाठीही अनेक ट्रॅव्हल्सतर्फे प्लॅनिंग टूर अरेंज करण्यात येत आहेत.बॅग्ज : आॅफिसमध्ये जाणाऱ्या तरुण-तरुणींना वेगवेगळ्या बॅग्ज वापरायला अधिक आवडतात. मुलांसाठी लेदरच्या लॅपटॉप बॅग आणि मुलींसाठी साईड बॅग आणि बॅगपॅक अशा ड्युअल युजच्या बॅगनाही तितकीच मागणी आहे. लेदर मटेरिअलच्या या बॅगा ८०० रुपयांपासून पुढे आहेत.फोटो प्रिंटेंड केक्सकुछ मिठा हो जाए! म्हणत केक कापून व्हॅलेंटाइन डे अनेक जण साजरा करतात. हल्ली केकवर ‘स्वत:चे फोटो प्रिंट’ करून घ्यायला अनेकांना आवडते. यंदाही अनेक केक शॉपमध्ये कपल्स मेमरीज् केक बनवून घेतले जात आहेत. केक ५०० रुपयांपासून पुढे आहेत.व्हॅलेंटाइन डेला चांगले दिसायला मुले आणि मुली दोघांना आवडते. फेब्रुवारीपासूनच अनेक जण स्वत:ला पॅम्पर करण्यासाठी पार्लरला येत आहेत; शिवाय अनेक कपल्स तर गिफ्ट म्हणून ‘ब्युटी पॅकेज’ची खरेदी करत आहेत. - तुषार चव्हाण, हेअर स्टायलिस्ट