शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

तुकोबांसह वैष्णवांची पाऊले पंढरीकडे

By admin | Updated: June 20, 2014 02:10 IST

भागवत धर्माच्या भगव्या पताका उंचावत.., वीणोचा झंकार, अखंड टाळ-मृदंगाचा निनाद करीत.., ‘ज्ञानोबा-तुकोबा’ असा आसमंत निनादणारा जयघोष..

श्रीक्षेत्र देहूगाव (जि़ पुणो) : भागवत धर्माच्या भगव्या पताका उंचावत.., वीणोचा झंकार, अखंड टाळ-मृदंगाचा निनाद करीत.., ‘ज्ञानोबा-तुकोबा’ असा आसमंत निनादणारा जयघोष.. अशा विठ्ठलतल्लीन वातावरणात जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने गरुवारी सायंकाळी आषाढी वारीसाठी अनंत तीर्थाचे माहेर असणा:या पंढरपुराकडे प्रस्थान ठेवले. आषाढी वारीसाठी वैष्णवांचा प्रवाह निघाला. पावसाने ओढ दिल्याचा परिणाम पालखी सोहळ्यातील गर्दीवर झाल्याचे जाणवले. 
‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल।, करावा विठ्ठल, जीवभाव।।’ अशी विठ्ठल भेटीची आर्तता वैष्णवांच्या चेह:यावर दिसून येत होती. ‘चला पंढरीशी जाऊ।, रखुमादेवीवरा पाहू।।, डोळे निवतील कान।, मना तेथें समाधान।।’ अशी तुकोबारायांच्या अभंगाची आठवण वैष्णव एकमेकांना करून देत होते. वैष्णवांची गर्दी, विठ्ठलभक्तीने इंद्रायणी ओसंडली होती.  पहाटेपासूनच इंद्रायणी तीरावर भक्तिचैतन्य निर्माण झाले होते. परिसरातील राहुटय़ांत अखंड हरिनामाचा गजर सुरू होता. वैष्णव नदीत येऊन स्नान करीत होते. दुसरीकडे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली होती. यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे वर्ष आणि दिंडय़ांची संख्या 329 आहे. 
तत्पूर्वी पहाटे मुख्य मंदिरातील शिळा मंदिरात, तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत तुकाराममहाराज देवस्थानाचे अध्यक्ष रामदास मोरे, पालखी सोहळाप्रमुख अशोक निवृत्ती मोरे, सुनील दामोदर मोरे, अभिजित मोरे यांनी महापूजा केली. त्यानंतर तसेच वैकुंठस्थान येथे उद्योजक मनु वालिया, तसेच पालखी सोहळ्याचे जनक नारायणमहाराज मंदिरात पूजा करण्यात आली. ढगाळ वातावरण असल्याने सूर्यनारायणाचे दर्शन आज उशिराने झाले. सकाळपासूनच सर्वत्र सोहळ्याची लगबग दिसली. मुख्य मंदिरात सकाळी संभाजीमहाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. परिसरातील राहुटय़ांमध्ये दिंडेकरी, फडकरी, वीणोक:यांची सोहळ्याची तयारी सुरू होती. सूर्य माध्यान्हीला येऊ लागला, तशा दिंडय़ा एकेक करून मुख्य मंदिराच्या दिशेने येऊ लागल्या. 
महाराजांच्या आजोळघरी अर्थात इनामदारवाडय़ात घोडेकर सराफांकडून पादुका इनामदार वाडय़ात आणण्यात आल्या. दिलीप मोरे यांनी पूजा केली. गंगा म्हसलेकर मंडळींनी दुपारी दीडच्या सुमारास मुख्य मंदिरात पादुका आणल्या. तोर्पयत मंदिर परिसर दिंडय़ांनी आपापली जागा घेतली होती. टाळ-मृदंगाचा गजर सुरू झाला. दुपारी अडीचच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वारातून बाभूळगावकरांचे, तसेच अकलूजच्या मोहिते-पाटलांचे मानाचे अश्व दाखल झाले. दुसरीकडे वीणामंडपात प्रस्थान सोहळा सुरू झाला. 
तुकोबारायांच्या पादुकांची पूजा माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार संजय भेगडे, देहूकर दिंडीतील ज्येष्ठ वारकरी शंकरराव अवघडे यांनी सपत्नीक केली. या वेळी मानकरी तसेच वीणोक:यांचा सत्कार करण्यात आला. दुसरीकडे मंदिर परिसरात दिंडेक:यांनी ‘ग्यानबा-तुकाराम’चा ठेका धरला होता. त्यातच वरुणराजाचा अधून-मधून होणारा अभिषेक वैष्णवांचा आनंद द्विगुणित करीत होता. प्रस्थान सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी वैष्णव आतुर झाले होते. आसमंत निनादला आणि भक्तिमय वातावरणात पालखी मंदिराबाहेर आली. त्या वेळी पादुका दर्शनासाठी झुंबड उडाली होती.  (प्रतिनिधी)
 
च्आळंदी देवाची : टाळमृदुंगाचा गजर, भजन, कीर्तन अन् प्रवचनाने अवघी अलंकापुरीच तीन-चार दिवसांपासून दुमदुमून निघाली आहे. विठूभेटीची आस लागलेले लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झाले आहेत. आता शुक्रवारी (दि. 2क्) दुपारी 4 वाजता मुख्य प्रस्थान सोहळ्यास आरंभ होणार आहे. 
च्आज पहाटेपासूनचे धार्मिक कार्यक्रमांमध्ये पहाटे 2.45 वाजता घंटानाद, काकडा झाल्यानंतर माऊलींना अभिषेक व पंचामृत पूजा, पहाटे साडेचार ते सकाळी साडेअकरा वाजेर्पयत भाविकांच्या महापूजा व दर्शन खुले राहील. दुपारी साडेबारा वाजता श्रींना दिल्या जाणा:या नैवेद्यासाठी दर्शन अर्धा तास बंद राहील. दुपारी दोननंतर भाविकांना दर्शन खुले राहील. दोन ते साडेतीन या वेळेत पालखीपुढे चालणा:या भक्तांच्या 27 ंिदंडय़ांना महाद्वारातून प्रवेश दिला जाईल व त्यांच्या पाठोपाठ अश्वांना प्रवेश दिला जाईल. चार वाजेर्पयत हैबतबाबा व संस्थानर्फे आरती होईल. वीणामंडपात मानक:यांना नारळ प्रसाद देऊन सुगंधी फुलांनी सजविलेल्या पालखीत माउलींच्या पादुका ठेवून पालखी मुख्य मंदिरातून बाहेर पडले.