शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैजनाथ भोईर यांचे निधन

By admin | Updated: October 21, 2014 03:51 IST

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ भोईर यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ भोईर यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि तीन बंधू व बहीण असे कुटुंब आहे.वैजनाथ भोईर हे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यासोबतच्या मित्रांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. भोईर हे मूळचे भार्इंदरजवळील मोरवा गावचे रहिवासी. शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा प्रारंभ केला. लोकसाथी दिवाळी अंक, लोकसत्ता दैनिकाचे वार्ताहर आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे (भार्इंदर) अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.ठाणे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे संमेलनही त्यांनी ज्येष्ठ पत्रकार विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले होते. ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांच्याशी त्यांचा उत्तम स्नेह होता. शिवाय लोकसाथी दिवाळी अंकाची प्रकाशने ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, शंना नवरे, मधू मंगेश कर्णिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते झाली होती. सोमवारी दुपारी ३ वाजता वैजनाथ भोईर यांच्या पार्थिवावर मोरवा या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांचे सहकारी आणि गावातील हजारो नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)