शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वैभव रास्कर ठरला कामगार केसरी

By admin | Updated: March 25, 2017 01:57 IST

चुरशीच्या रंगलेल्या लढतीत सांगलीचा पैलवान वैभव रास्कर याने साताऱ्याच्या विकास पाटीलवर तांत्रिक गुणाच्या आधारे मात करुन

मुंबई : चुरशीच्या रंगलेल्या लढतीत सांगलीचा पैलवान वैभव रास्कर याने साताऱ्याच्या विकास पाटीलवर तांत्रिक गुणाच्या आधारे मात करुन प्रतिष्ठेच्या कामगार कुस्ती स्पर्धा विजेतेपदावर कब्जा केला. त्याचवेळी, कुमार केसरीसाठी झालेल्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या विक्रम मोरेने बाजी मारली.महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ना.म. जोशी मार्गावरील कामगार मैदानात रंगतदार कुस्ती पार पडल्या. मुंबई शहर तालिम संघाच्या सहकार्याने खेळवण्यात आलेल्या कामगार केसरीच्या अंतिम सामन्यात कुंडल येथील पैलवान वैभवने आक्रमक सुरुवात केली. प्रत्युत्तरात साताऱ्याचा विकासने शानदार बचाव करत प्रतिडाव रचत वैभवला झुंजवण्याचा चांगला प्रयत्न केला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात निर्णायक गुणांची कमाई करताना तांत्रिक गुणाच्या आधारे वैभवने बाजी मारत मानाची गदा उंचावली.कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या कुमार केसरी स्पर्धेतही तांत्रिक गुणांच्या आधारे कोल्हापूर, कुंभी कासरीच्या विक्रम मोरेने विजय मिळवला. सरदार बरगेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कामगार केसरी आणि कुमार केसरी विजेत्या रोख रक्कम, गदा, मानाचा पट्टा व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेतील अन्य लढतीत ५७ किलो वजनी गटात नामदेव घाडगे, ६१ किलो वजनी गटात दिलीप शेंबडे, ६५ किलो गटात अमोल पवार, ७० किलो गटात दिग्विजय जाधव आणि ७४ किलो वजनी गटात भगतसिंग खोत यांनी अव्वल क्रमांक पटकावला. (क्रीडा प्रतिनिधी)