शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

राणेंच्या विजयाचा वारू वैभव नाईकांनी रोखला

By admin | Updated: October 19, 2014 22:26 IST

१0 हजार ३७६ चे मताधिक्य : शिवसेना कार्यकर्त्यांचा जिल्ह्यात जल्लोष

सिंधुदुर्गनगरी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रचारप्रमुख तथा माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांचा शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी तब्बल १० हजार ३७६ मतांनी पराभूत केले. १९९० पासून २०१४ पर्यंत सलग २५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राजकीयदृष्ट्या वर्चस्व गाजविणाऱ्या राणे यांना विजयात सातत्य राखण्यापासून नाईक यांनी रोखले आहे. वैभव नाईक यांना ७० हजार ५८२ तर नारायण राणे यांना ६० हजार २०६ मते मिळाली.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया १५ आॅक्टोबर रोजी पार पडली तर रविवारी सिंधुदुर्गनगरी येथील सामाजिक न्याय भवन येथे मतमोजणी प्रक्रिया अतिशय शांततेत व सुरळीत पार पडली. या मतमोजणीसाठी सी.आर.पी.एफ. जवान तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पार पडलेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेचे वैभव नाईक १० हजार ३७६ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांना ६० हजार २०६ मते मिळाली तर विजयी उमेदवार वैभव नाईक यांना ७० हजार ५८२ मते मिळाली. भाजपचे उमेदवार विष्णू मोंडकर यांना ४८१९ मते, बहुजन समाज पार्टीचे रविंद्र कसालकर यांना १०७१ मते, राष्ट्रवादीचे पुष्पसेन सावंत यांना २६३२ मते, अपक्ष उमेदवार स्नेहा केरकर यांना ७४७ एवढी मते मिळाली आहेत. तर ९४९ एवढी नकाराधिकार (नोटा) मते पडली.गेली २५ वर्षे सिंधुदुर्गावर सत्ता असणाऱ्या काँग्रेसचे नारायण राणे यांचा शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी १० हजार ३७६ मतांनी पराभव केला आहे. रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. एकूण २० फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये वैभव नाईक यांनी आघाडी होती. त्यानंतर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर सर्वच फेऱ्यांमध्ये वैभव नाईक यांनी आघाडी घेत काँग्रेसचे नारायण राणे यांचा तब्बल १० हजार ३७६ मतांनी पराभव केला.विजयी उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, हा माझा विजय म्हणजे सर्वसामान्य सिंधुदुर्गवासिय जनतेचा विजय आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू काढले त्यांना आपली जागा समजली आहे. बाळासाहेब आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर भगवा फडकविण्याचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी जिल्हावासियांमुळे मला मिळाली आहे. त्यांचे मी प्रथम आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवून येथील जनतेने मला विजयी केले आहे. मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी माझा सिंधुदुर्ग जिल्हा आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे यावेळी सांगितले.शिवसेनेने काढली विजयी रॅलीविजयी उमेदवार वैभव नाईक यांनी सामाजिक न्याय भवन ते शिवाजी चौक (ओरोस फाटा) ते रवळनाथ मंदिरपर्यंत विजयी रॅली काढली. सुमारे २ हजार एवढ्या शिवसैनिकांनी हातात भगवा झेंडा घेत ही रॅली काढली. यावेळी गाड्यांचा ताफाही मोठ्या प्रमाणात होता. यावेळी वैभव नाईक यांनी रवळनाथ मंदिरात जावून दर्शन घेतले. त्यानंतर कुडाळच्या दिशेने रवाना झाले.एक नजर राणेंच्या राजकीय करिअरवरसन १९९० मध्ये मालवण विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांनी पहिली निवडणूक शिवसेनेत असताना लढविली होती. त्यावेळी त्यांना ३१ हजार २४४ मते मिळाली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर १९९५ मध्ये त्याच मतदारसंघात राणे यांना ५६ हजार १०१ मते मिळून विजय संपादन केला होता. १९९९ मध्ये पुन्हा त्याच मतदारसंघात राणे यांनी निवडणूक लढवून ४१ हजार २८ मते मिळवून विजय संपादन केला होता. २००४ च्या निवडणुकीत राणे यांना ६३ हजार ७८४ मते मिळवून एकतर्फी विजय मिळविला होता. त्यानंतर २००५ मध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राणे (काँग्रेस) हे ७८ हजार ६१६ मते मिळवून विजय प्राप्त केला. त्यानंतर २००९ च्या कुडाळ विधानसभा मतदारसंघात राणे यांना ७१ हजार ९२१ मते मिळून ते विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ च्या कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राणे मात्र १० हजार ३७६ मतांनी शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून पराभूत झाले आहेत.अन् विजयी प्रमाणपत्र प्रदानमतमोजणी पूर्ण झाल्यावर कुडाळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र बोंबले यांनी वैभव नाईक यांना विजयी घोषित केले. यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, निवडणूक निरीक्षक अमिताभ गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, कुडाळचे तहसीलदार जयराज देशमुख उपस्थित होते. यानंतर वैभव नाईक यांना बोंबले यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.नाईक यांना कुडाळ येथे मताधिक्यवैभव नाईक यांना मालवणमधून २५५६ मतांचे मताधिक्य मिळाले तर कुडाळ तालुक्यातून ७६४७ एवढे मताधिक्य मिळाले आहे. कुडाळ तालुक्यातील कसाल, हिर्लोक, वारंगाची तुळसुली, ओरोस, माणगांव आदी भागांमध्ये मताधिक्य मिळाले आहे.चारजणांची अनामत रक्कम जप्तया निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पुष्पसेन सावंत, भाजपचे उमेदवार बाबा उर्फ विष्णू मोंडकर यांच्यासह बसपाचे रविंद्र कसालकर आणि अपक्ष उमेदवार स्नेहा केरकर या चारही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे.अनामत रक्कम वाचविण्यासाठी एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश एवढी मते उमेदवारास पडणे आवश्यक असते. कुडाळ मतदारसंघात एकूण १ लाख ४१ हजार ६६ एवढी वैध मते होती. त्यातील २३ हजार ५११ मते मिळणे आवश्यक होते. (प्रतिनिधी)घटनाक्रम...मतमोजणी सुरु होण्याच्या अगोदर सामाजिक न्याय भवन (सिंधुदुर्गनगरी) येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त.प्रत्यक्षात आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ...आपणास लीड आहे असे कळल्यावर शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी मतमोजणी केंद्रात सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी प्रवेश केला.काँग्रेस उमेदवार राणे यांचा पराभव समोर दिसू लागल्याने मतमोजणी ठिकाणी प्रवेश केलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, अशोक सावंत, संजय पडते, राजन परब, दिनेश साळगांवकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतमोजणीस्थळ सोडले.सकाळी ११ च्या सुमारास वैभव नाईक यांचा विजय निश्चित झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष.फटाके फोडून साजरा केला जल्लोष.मतमोजणी सुरु असताना मतमोजणी महिला कर्मचाऱ्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.आमदारकीच्या शर्यतीत उडी मारलेल्या बसपाचे उमेदवार रविंद्र कसालकर यांनी मतमोजणी ठिकाणी शेवटी हजेरी लावली होती.