शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वडवली हत्याकांड : हसनैनची शेअरबाजारात साडेचार कोटींची उलाढाल

By admin | Updated: March 10, 2016 03:48 IST

संपूर्ण कुटुंब संपवणारा क्रुरकर्मा हसनैन वरेकर याने गेल्या पाच वर्षांत शेअर बाजारात तब्बल साडेचार कोटींची उलाढाल केली होती.

जितेंद्र कालेकर,  ठाणेसंपूर्ण कुटुंब संपवणारा क्रुरकर्मा हसनैन वरेकर याने गेल्या पाच वर्षांत शेअर बाजारात तब्बल साडेचार कोटींची उलाढाल केली होती. मात्र जानेवारी २०१६ मध्ये त्याच्या सिंडीकेट बँकेतील खात्यात एक पैसाही बॅलन्स नव्हता. या आर्थिक फटक्यातून सावरण्याकरिता त्याने वेगवेगळ््या लोकांकडून लक्षावधी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड तो करु शकत नव्हता. त्यातच मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या बत्तुलच्या औषधाच्या गोळ््या हसनैन वैद्यकीय सल्ला न घेता खात होता, अशी माहिती आता तपासात उघड झाली आहे.आर्थिक संकटात सापडलेला हसनैन गेले काही महिने आपल्या बहिणींसोबत विकृत चाळे करीत होता. मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेली औषधे परस्पर खात होता. वडील व आईकडे कर्जाच्या खाईतून बाहेर पडण्याकरिता पैशाची मागणी करीत होता. हे सर्व लक्षात घेतल्यास हसनैन हाही या परिस्थितीतून मनोरुग्ण बनला होता किंवा कसे, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.शेअर बाजारात पैसे गुंतविण्यासाठी हसनैनने घोडबंदर रोडवरील सिंडीकेट बँकेत डीमॅट अकाऊंट सुरु केला होता. याच खात्यात त्याने गेल्या चार ते पाच वर्षांत तब्बल साडेचार कोटींची उलाढाल केली, असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. काहीवेळा तो तोटयात असला तरी त्याची गुंतवणूक अव्याहत सुरुच होती. याच काळात त्याने आई आणि मावशीला त्यांच्या माहेरुन मिळालेले ३० लाख रुपये घेतले तर मेव्हणे शौकत खान यांच्याकडून सात लाख, आई असगडी आणि पत्नी जबीन यांचे दागिने विजय पार्क येथील एका सोनाराकडे गहाण ठेवून साडेतीन लाखांचे कर्ज घेतले. सुबियाच्या लग्नाच्या वेळीही त्याने पाच लाखांचे कर्ज त्याने घेतले होते. असे ७० ते ८० लाखांचे कर्ज त्याच्यावर असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.बहिणीच्या गोळ््या खायचाहसनैनची लहान बहिण बत्तुल ही तीन दिवसांची असल्यापासून तिची मानसिक प्रकृती चांगली नव्हती. त्यावेळी ठाण्याच्या डॉ. साने यांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, फरक न पडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुणे येथील डॉ. देव यांच्याकडे उपचार सुरू होते. कर्जबाजारी झाल्यानंतर कुवैतला जाण्याकरिता हसनैन वडिलांकडे ४५ लाखांची मागणी करीत होता. मात्र ती त्यांनी पूर्ण झाली नाही. त्या बेचैनीमुळे त्याला झोप येत नव्हती. बहिणीला दिलेल्या गोळ््या तो खायचा. आईने त्याला रोखले होते. मीच गोळया आणल्या आहेत, मला काय करायचे ते माहित आहे, असे तो सांगायचा, अशी माहिती सुबियाने पोलिसांना दिली