शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात यावर्षी खताचा साठा मुबलक

By admin | Updated: April 25, 2017 00:54 IST

अकोला : यावर्षी बियाण्यांच्या मुबलकतेसह विविध रासायनिक खतांच्या मुबलक साठ्याचे पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांसाठी नियोजन करण्यात आले आहे.

५ लाख ७९ हजार मेट्रिक टनाचे आवंटनअकोला : यावर्षी बियाण्यांच्या मुबलकतेसह विविध रासायनिक खतांच्या मुबलक साठ्याचे पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांसाठी नियोजन करण्यात आले आहे. मागील तीन वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत सव्वा लाख मेट्रिक टन जास्त म्हणजेच ५ लाख ७९ हजार मेट्रिक टन खताचा हा साठा आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ११ हजार मेट्रिक टन खते प्रत्यक्षात उपलब्ध झाले आहेत.भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी पावसाचा अनुकूल अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याच पृष्ठभूमीवर कृषी विभागाने येत्या खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान समजावून सांगण्यासाठी यांत्रिकीकरण, बीबीएफ प्लॅटर आदीद्वारे पेरणी कशी करावी व विविध शेती तंत्रज्ञान वापरू न उत्पादन वाढविण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच शेतकऱ्यांना दरवर्षी भेडसावणारा बियाणे आणि रासायनिक खताचा प्रश्न यावर्षी आतापासूनच निकाली काढण्यात आला आहे.पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती याच पाच जिल्ह्यात मागील तीन वर्षांत सरासरी ४ लाख ८३ हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. मागच्यावर्षी २०१६ च्या खरीप हंगामात ४ लाख ५२ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध करण्यात आले होते. यावर्षी ५ लाख ७९ हजार मेट्रिक टनाचे आवंटन करण्यात आले असून, आजमितीस १ लाख ११ हजार मेट्रिक टन विविध रासायनिक खतांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. या खताच्या साठ्यांमध्ये युरिया, सिंगल सुपर फास्फेटसह डीएपी खताचा साठा आहे.पश्चिम विदर्भात यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र जवळपास १५ ते १७ लाख हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता असली, तरी चांगल्या पावसाचा अंदाज बघता कापसाचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.रासायनिक खताचा साठा यावर्षी मुबलक असून, बियाण्यांचीही मुबलकता आहे. त्यामुळे यावर्षी खते व बियाण्यांची अडचण भासणार नाही. पावसाचा अंदाजही अनुकूल असल्याचे शेतकऱ्यांना अडचण भासू नये, यासाठीची तयारी कृषी विभागाने केली आहे. -एस.आर. सरदार, विभागीय संयुक्त संचालक,अमरावती.