शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

थुंकाल तर सफाईची शिक्षा!

By admin | Updated: February 5, 2016 04:20 IST

सार्वजनिक स्वच्छतेबाबतच्या कायद्याचा मसुदा अंतिम टप्प्यात असून अशा ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीस सफाईची शिक्षा ठोठावावी, ही तरतूद करण्यास सरकार गंभीर आहे

मुंबई : सार्वजनिक स्वच्छतेबाबतच्या कायद्याचा मसुदा अंतिम टप्प्यात असून अशा ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीस सफाईची शिक्षा ठोठावावी, ही तरतूद करण्यास सरकार गंभीर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून परळच्या टाटा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. हे माहीत असूनही ३०-३५ वयोगटातील व्यक्ती कर्करोगाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येते. हे ध्यानी घेता, थुंकण्याविरोधी कायद्याची चोखपणे अंमलबजावणी होणे अतिशय गरजेचे आहे. सध्या शिक्षा म्हणून काही रुपयांचा दंड आकारला जातो. श्रीमंत व्यक्तींना १००-५०० रुपये दंड देणे सहज शक्य असते. पण, त्याऐवजी शिक्षा म्हणून त्यांना साफसफाई करायला लागली, तर थुंकण्याच्या सवयीला आळा बसू शकतो. त्यामुळे अशा शिक्षेची कायद्यात तरतूद करण्याचा विचार असून याविषयी काम अंतिम टप्प्यात आहे.कर्करोग रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाइकांना मुंबईत राहण्याची सोय नसते. अशावेळी त्यांना रस्त्यावर, रुग्णालयाच्या व्हरांड्यात राहावे लागते. अशा नातेवाइकांचे हाल होऊ नयेत म्हणून विशेष इमारतींची सोय करण्यात येणार आहे. एसआरएच्या माध्यमातून तीन इमारती नातेवाइकांसाठी देण्यात येणार आहेत. याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येथे नातेवाइकांना इतर सुविधांसह भोजनाचीही सोयदेखील करण्यात येणार आहे.मध्य प्रदेशहून नागपूरमध्ये उपचारास येणारे कॅन्सरचे रुग्ण एवढे आहेत, की तेथून येणाऱ्या एका ट्रेनला ‘कॅन्सर ट्रेन’ असे संबोधले जाते. या रुग्णांवर येथील ‘संत तुकडोजी महाराज रुग्णालया’त उपचार होतात. येथे कर्करोगासाठी ३०० खाटांचे विशेष रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.