शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल, अनधिकृत तिकीट एजंटांची चांदी

By admin | Updated: April 16, 2017 19:42 IST

उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल आहेत.

ऑनलाइन लोकमतमिरज, दि. 16 - उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची मेअखेर आरक्षित तिकिटे संपली असून, प्रतीक्षा यादी चारशेवर पोहोचली आहे. आरक्षित तिकिटांना मोठी मागणी असल्याने अनधिकृत तिकीट एजंटांची चांदी झाली आहे. आरक्षित तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एजंटांच्या तिकीट खिडकीवर रांगा आहेत. उन्हाळी सुट्टीत रेल्वे प्रवासाला गर्दी असल्याने आरक्षित तिकिटांना मोठी मागणी आहे. मिरजेतून सुटणाऱ्या निजामुद्दीन, अजमेर, जोधपूर, तिरुपती, बेंगलोर, एर्नाकुलम, तिरुनेलवेल्ली, चंदीगड, नागपूर, अहमदाबाद या सर्वच दररोज व साप्ताहिक एक्स्प्रेस मेअखेर फुल्ल आहेत.निजामुद्दीन, अजमेर, जोधपूर यांसारख्या रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी चारशेपेक्षा जास्त आहे. यामुळे तात्काळ तिकिटे मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू आहे. रेल्वे तिकीट खिडकीवर विक्री सुरू झाल्यानंतर किमान अर्धा तास मिळणारी तात्काळ तिकिटे आता केवळ पाचच मिनिटांत संपत आहेत. गोवा-निजामुद्दीन, बेंगलोर-अजमेर, बेंगलोर-जोधपूर या प्रीमियम दर्जाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या आरक्षित तिकिटांसाठी पहिल्या पाच मिनिटांनंतर वाढत जाणाऱ्या प्रीमियम दराने दुप्पट ते चौपट पैसे मोजावे लागतात.आरक्षित तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर केवळ पाच मिनिटांत प्रीमियम दराने तिकीट विक्री सुरू होत असल्याने तिकीट खिडकीवर पहिला आणि दुसरा क्रमांक मिळविण्यासाठी रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर रात्रभर एजंटांच्या रांगा आहेत. यामुळे सामान्यांना आरक्षित व तात्काळ तिकिटे मिळणे अशक्य ठरले आहे. आरक्षित तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी ओळखपत्राची सक्ती, वातानुकूलित दर्जा, तात्काळ व आरक्षित तिकीट विक्रीसाठी स्वतंत्र वेळ, अशा उपाययोजना रेल्वे प्रशासनाने केल्या आहेत. मात्र मिरजेत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने तिकीट खिडकीवर एजंटांचा कब्जा असल्याचे दररोज सीसीटीव्हीत चित्रण होत आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळाबाजार जोमात सुरू असताना रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांचे दुर्लक्ष आहे. अनधिकृत तिकीट एजंट आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून वेगवेगळ्या नावाने ई-तिकिटे काढत आहेत. ई-तिकिटांसाठीही सामान्य प्रवासी अद्यापही एजंटांवर अवलंबून आहेत.