शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या खुर्च्या अन् पुणेकर!

By admin | Updated: February 19, 2017 03:23 IST

महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शनिवारी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात प्रचारसभा आयोजित केली होती. मात्र, मुख्यमंत्री सभास्थानी पोहोचून पाऊन

- मुख्यमंत्री सभा सोडून परतले

पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शनिवारी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात प्रचारसभा आयोजित केली होती. मात्र, मुख्यमंत्री सभास्थानी पोहोचून पाऊन तास वाट पाहिल्यानंतरही सभेला अपेक्षित गर्दी न झाल्याने, त्यांनी भाषण न करताच पिंपरीकडे प्रस्थान केले. दुपारी १ ते ४ ही पुणेकरांची विश्रांतीची वेळ असते, त्यामुळे ते कुठेच जात नाहीत. मग सभेला उपस्थित राहतील, ते पुणेकर कसले? असे संदेश दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते.व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, खा. अनिल शिरोळे, आ. विजय काळे व शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. नियोजित वेळेनुसार फडणवीस सभास्थानी पोहोचले. मात्र, बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे फडणवीस हे गाडीतच बसून राहिले. काही वेळात गर्दी जमा होईल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, पाऊण तास वाट पाहिल्यानंतरही सभेला गर्दी जमण्याची चिन्हे दिसेना, त्यामुळे त्यांनी भाषण न करताच परतण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)मिस कम्युनिकेशनसभेच्या ठिकाणाहून पिंपरीतील सभेकडे जात असताना, ‘मिस कम्युनिकेशन’मुळे पुण्यातील सभेत भाषण करू शकत नसल्याचे ट्विट फडणवीस यांनी केले. तर मुख्यमंत्र्यांना पुढे पिंपरी व नाशिकमध्ये सभा घ्यायच्या होत्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी लँडिंग करणे शक्य नसल्यामुळे त्यांना लवकर निघावे लागले, असे बापट यांनी सांगितले.