शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वाखरीत भक्तीत न्हाला वैष्णवमेळा; रिंगणांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 06:16 IST

शहाजी फुरडे-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क पंढरपूर : टिपेला पोहोचलेला टाळमृदंगाचा गजर,अश्वांची दौड, भाविकांचा कल्लोळ अन् वरुणराजाच्या अभिषेकाने बाजीरावच्या ...

शहाजी फुरडे-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : टिपेला पोहोचलेला टाळमृदंगाचा गजर,अश्वांची दौड, भाविकांचा कल्लोळ अन् वरुणराजाच्या अभिषेकाने बाजीरावच्या विहीजवळच्या रिंगणात वैष्णवांचा अवघा सोहळा भक्तीत चिंब झाला. पंढरपूरपासून अवघ्या दोन कोसावर वाखरीत रात्री संतमेळा दाखल झाला असून उद्या गुरूवारी हा मेळा पंढरपुरात दाखल होणार आहे. पालखी मार्गावर बुधवारी बाजीरावच्या विहिरीजवळ संत सोपानकाका, संत ज्ञानेश्वर महाराज अािण संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील गोल व उभी रिंगणे रंगल्याने वैष्णवांसह भक्तांना मेजवानी पहायला मिळाली.

पालखी मार्गाने आज संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका यांच्यासह इतर पालख्यांची वाटचाल सुरू होती. बाजीरावच्या विहीरजवळ दुपारी चारच्या सुमारास रस्त्यावरच अगोदर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे उभे रिंगण झाले. आणि नाचत नाचत दिंड्या व अश्व बाजुच्या शेतात गोल रिंगणासाठी सज्ज झाले.शेवटच्या गोल रिंगणासाठी शेतात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विजेच्या चपळाईने तीन फेऱ्या मारून अश्वांनी अवघ्या सोहळ्यात चैतन्य फुलविले. हा सोहळा रात्री वाखरी येथे मुक्कामी गेला. वाखरीत रात्री मंगळवेढ्याहून दामाजी पंतांचीही पालखी दाखल झाली.उद्या, शुक्रवार सर्व संतांच्या पालख्या मिळून पंढरीत दाखल होणार आहेत. सर्वात पुढे संत सोपानकाका, त्यामागे संत तुकाराम महाराज आणि सर्वात शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरीतून निघेल. मार्गात इसबावी येथे संत एकनाथ महाराज व संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत दामाजी पंत, संत नामदेव यांच्या पालख्या सामील होतील. आणि हा संतमेळा रात्री पंढरपुरात मुक्कामी जाईल. तत्पूर्वी विसाव्याजवळ विविध पालख्यांची उभी रिंगणे होणार आहेत.तीर्थक्षेत्राच्या लेखी मंगळवेढा संतभूमीची गणनाच नाहीबाळासाहेब बोचरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संतांची जन्मभूमी असलेल्या मंगळवेढ्याला शासनाने अद्याप तीर्थक्षेत्राचा दर्जाच न दिल्याने संतांची मंगळवेढे भूमी विकासापासून दूरच राहिली आहे.दुष्काळामध्ये शासनाचे गोदाम रिकामे करुन उपाशी जनतेला धान्य वाटणारे संत दामाजी पंत, अनेक अभंगाची रचना करुन भक्तीभाव जागृत ठेवणारे संत चोखामेळा आणि संत कान्होपात्रा या संतांची मंदिरे मंगळवेढा नगरीत आहेत. श्री स्वामी समर्थानीही या नगरीत काही वर्षे घालवली. लिंगायत धर्माचे महात्मा बसवेश्वर, संत सीतराम महाराज खर्डीकर, संत बंका, श्री संत गोविंदबुवा, संत गाडगेबाबा अशा १७ संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. पंढरपूरपासून अवघ्या २० किमीवर हे क्षेत्र आहे.दामाजी पंतांनी संभाळलेला निजामाचा किल्ला आजही बकाल अवस्थेत आहे. देशात पुष्कर आणि मंगळवेढा या ठिकाणीच ब्रह्मदेवाच्या मूर्ती आहेत. मंगळवेढ्याची मूर्ती महादेवाच्या विहिरीत पडलेली आहे. महात्मा बसवेश्वराच्या स्मारकासाठी ५० कोटींची घोषणा केली पण झाले काहीच नाही.