ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 19 - चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर देवळी आडगाव येथे लक्झरी बस पलटी झाल्याने 30 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकजण गंभीर असल्याचं वृत्त आहे.
प्राथमिक वृत्तानुसार, धरणगावमधील साकुर येथील लग्नसोहळा संपवून परतत असताना देवळी गावाजवळ एका वळणावर लक्झरी पलटी झाली आणि पुलाखाली कोसळली. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, सुविधांचा अभाव असल्याने उपचार करण्यास अडचणी येत होत्या त्यामुळे गंभीर जखमींना धुळ्यातील हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.