शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उस्मान व सुलेमान झाले नि:शब्द

By admin | Updated: July 31, 2015 04:12 IST

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला फाशी देण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले होते ते त्यांच्या कुटुंबीयांकडे. याकूबचे भाऊ उस्मान व सुलेमान हे सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते.

- योगेश पांडे,  नागपूरमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला फाशी देण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले होते ते त्यांच्या कुटुंबीयांकडे. याकूबचे भाऊ उस्मान व सुलेमान हे सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. फाशी झाल्याचे कळताच दोघांच्याही संयमाचा बांध फुटला व हॉटेलच्या रूममध्ये ते एकमेकांना बिलगून रडले. ८.१५ च्या सुमारास हॉटेलमधून तुरुंगाकडे जात असतानादेखील ते एकमेकांना धीर देतच बाहेर आले. शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या याकूबची फाशी कायद्यातील विविध तरतुदींचा आधार घेऊनही टळू न शकल्यामुळे दोघेही निराश झाले होते. नवी दिल्लीत रात्रभर सुरू असलेल्या घडामोडींनंतर याकूबची फाशी थांबणार नाही हे स्पष्ट झाले होते. उस्मान व सुलेमानला रात्री २.१५ वाजताच्या सुमारास तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हॉटेलवर येऊन फाशीसंदर्भात नोटीस दिली. राष्ट्रपतींनी याकूबची दया याचिका फेटाळली आहे आणि ‘डेथ वॉरंट’प्रमाणे फाशीची प्रक्रिया सकाळी पूर्ण करण्यात येईल या दोन बाबी नोटिसीत नमूद होत्या. ही नोटीस हाती पडताच सुलेमान व उस्मानचे अवसानच गळाले. वकिलांचा सल्ला, नातेवाइकांना सूचनादरम्यान, पहाटेच्या सुमारास मुंबई येथे फोन करून त्यांनी नातेवाइकांना अंत्यविधीसंदर्भात काही सूचना दिल्या. याकूबचा मृतदेह मिळाला नाही तर काय करायचे याबाबत वकिलांशीही त्यांनी चर्चा केली. बराच वेळ ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ : याकूबला फाशी दिल्यानंतर दोघेही कारागृहाकडे कधी निघतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उस्मान ६.३० नंतर लिफ्टने खालीदेखील आला. परंतु प्रसिद्धीमाध्यमांची गर्दी पाहून आल्यापावली परत गेला. लुंगी घालून आलेल्या उस्मानच्या हाती यावेळी काही कागदपत्रे होती व डोळे पूर्णत: लाल झाले होते. त्यानंतर दोघेही तासभर खोलीतच बसून होते. अखेर तुरुंगातील शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती कळताच दोघेही सकाळी ८ च्या सुमारास तुरुंगाकडे रवाना झाले.