शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

कर्करोग रुग्णांसाठी ‘हिप्पोथेरपी’ ठरतेय उपयुक्त

By admin | Updated: February 4, 2017 01:57 IST

कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचारादरम्यान येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक ताणावर मात करणे हे सर्वांत मोठे आव्हान असते. जागतिक स्तरावर विविध पातळ्यांवर

- स्नेहा मोरे,  मुंबई

कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचारादरम्यान येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक ताणावर मात करणे हे सर्वांत मोठे आव्हान असते. जागतिक स्तरावर विविध पातळ्यांवर कर्करोगविषयक संशोधन सुरू आहे. त्याच धर्तीवर, १९४६ साली युरोपमध्ये पोलिओच्या उद्रेकानंतर ‘इक्वान थेरपी’ अर्थात हिप्पोथेरपीचा प्रथम वापर करण्यात आला. भारतात मात्र पहिल्यांदाच ७१ वर्षांनंतर आता हा प्रयोग होणार आहे. या थेरपींतर्गत कर्करुग्णांना घोड्यांच्या सहवासात ठेवले जाते. ‘जागतिक कर्करोग दिना’चे निमित्त साधून कर्करोग रुग्णांना घोड्यांच्या सहवास नेऊन वेगळ्या धाटणीच्या उपचार पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. घोड्यांसोबत काही वेळ सहभागी व्हावे लागते. या थेरपीच्या माध्यमातून समतोल, स्नायूंची पुनर्बांधणी, प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. तर मानसिकरीत्या रुग्णाचा आत्मविश्वास वाढविणे, चिंता कमी करणे, नैराश्यावस्थेतून रुग्णाला बाहेर काढण्यास साहाय्य करत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ‘हिप्पोथेरपी’च्या माध्यमातून रुग्णाचे घोड्याशी वेगळ्या प्रकारचे भावनिक नाते तयार होते. या माध्यमातून कर्करोगामुळे दीर्घकाळ मानसिक संतुलन ढासळलेल्या रुग्णांना दुहेरी विकास साधता येतो. परदेशात याविषयी विविध संस्था कार्यरत असून रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही उपचार पद्धती आखली जाते. अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन संस्थेने स्तनाचा कर्करोग झालेल्या २० महिलांसोबत ही उपचार पद्धती राबविली.१६ आठवड्यांच्या या उपचार पद्धतीत घोड्यांची काळजी घेणे, घोडेस्वारी, घोड्यांच्या दिनचर्येत सहभागी होणे अशा विविध कार्यांचा समावेश होतो. या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अभ्यासांती सहभागी रुग्णांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत विकास झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)- रुग्ण घेणार सहभागजागतिक कर्करोग दिनाचे निमित्त साधून इंडियन कॅन्सर सोसायटी आणि अ‍ॅमच्युर रायडर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील १५-२० कर्करोग रुग्ण ‘इक्वान थेरपी’चा लाभ घेणार आहेत. शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता हा कार्यक्रम महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर पार पडेल.भविष्यात आपल्या देशातही याविषयी जनजागृती करून या उपचार पद्धतीचा विस्तार करण्याचा विचार आहे. ही उपचारपद्धती नक्की लाभदायक ठरेल, असा विश्वास आहे.- डॉ. विनय देशमाने, सर्जिकल आॅन्कोलॉजिस्ट, वैद्यकीय संचालक (इंडियन कॅन्सर सोसायटी)