शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात कारवाई टाळण्यासाठी दिखाऊ हेल्मेटचा वापर

By admin | Updated: June 20, 2017 20:46 IST

विनाहेल्मेट दुुचाकी चालविणाऱ्यांविरोधात कोल्हापूरमध्ये पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतील पाचशे रुपयांचा दंड टाळण्यासाठी

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. २0 : विनाहेल्मेट दुुचाकी चालविणाऱ्यांविरोधात कोल्हापूरमध्ये पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतील पाचशे रुपयांचा दंड टाळण्यासाठी वाहनधारकांकडून केवळ दिखाऊ स्वरूपातील हेल्मेटचा वापर सुरू आहे. त्यामुळे अशा स्वरूपातील हेल्मेट असूनही जीव धोक्यात घालून काहींचा प्रवास सुरू आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. यात त्यांनी महामार्गावर हेल्मेटचा वापर बंधनकारक केला आहे. जे वाहनधारक विना हेल्मेट असतील, त्यांना पाचशे रुपयांचा दंड करण्यात येत आहे. पोलिसांनी हेल्मेटबाबतची कारवाई कडक केली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या कारवाईतून वाचण्यासाठी अनेक दुचाकीधारकांकडून हेल्मेट खरेदीची धावपळ सुरू आहे. यांतील काहीजण सुरक्षित आणि चांगल्या दर्जाच्या हेल्मेटला प्राधान्य देत आहेत. मात्र, काही वाहनधारकांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या आणि आयएसआय मार्क नसलेल्या केवळ दिखाऊ स्वरूपातील हेल्मेटचा वापर केला जात आहे. शहर आणि शहरालगतच्या महामार्गांवर ठिकठिकाणी अशा दिखाऊ हेल्मेटची विक्री सुरू आहे. यात हाफ अँड विथ ग्लास, कॅप आणि फुल या प्रकारात हेल्मेट उपलब्ध आहेत. यातील फुल हेल्मेट ही ३५० ते ४००, हाफ अँड विथ ग्लास हे ३५०, तर कॅपची किंमत २०० ते ३०० रुपये इतकी आहे. यातील बहुतांश हेल्मेट बघताच ती केवळ दिखाऊ असल्याचे स्पष्ट होते. यात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक घटकांचा समावेश नाही. हेल्मेटची मागणी, ग्राहकांची गरज आणि आर्थिक स्थिती लक्षात घेऊन विक्रेत्यांनी विविध स्वरूपांतील हेल्मेट बाजारपेठेत उपलब्ध करून दिली आहेत. सध्या दिल्ली आणि चेन्नई येथून हेल्मेट विक्रीसाठी कोल्हापुरात येत आहेत. विनाहेल्मेट प्रवास करून दंड भरण्यापेक्षा तीनशे रुपयांपर्यंतचे अशा स्वरूपातील हेल्मेट घेण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे. मात्र, ते या पर्यायातून स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहेत. सुरक्षितता तपासणे गरजेचे एकीकडे हेल्मेटचा वापर बंधनकारक केला असताना वाहनधारक वापरत असलेली हेल्मेट खरेच सुरक्षित आहे का? याची तपासणी होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने यंत्रणा कार्यन्वित व्हावी. अन्यथा सुरक्षिततेऐवजी निव्वळ कारवाई, दंड टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करण्याला बळ देण्यासारखे आहे. 

सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. केवळ दंडाच्या स्वरूपातील कारवाई टाळण्यासाठी सुरक्षित नसलेले हेल्मेट वापरणे म्हणजे एक प्रकारे स्वत:ची फसवणूक करण्यासह जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे दुचाकीचालकांनी सुरक्षिततेचे आवश्यक घटक आणि चांगल्या दर्जाची हेल्मेट वापरण्यास प्राधान्य द्यावे. - अशोक धुमाळ,पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा