शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

निवडणूक कामांसाठी परिवहनच्या बसेसचा वापर

By admin | Updated: October 15, 2014 04:08 IST

मीरा-भार्इंदर पालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे २५ टक्के बस निवडणूक कामाला जुंपल्याने प्रवाशांना बसेस कमी पडल्या. परिणामी, रहिवाशांना एसटी तसेच रिक्षांचा आधार घ्यावा लागला.

राजू काळे, भार्इंदरमीरा-भार्इंदर पालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे २५ टक्के बस निवडणूक कामाला जुंपल्याने प्रवाशांना बसेस कमी पडल्या. परिणामी, रहिवाशांना एसटी तसेच रिक्षांचा आधार घ्यावा लागला.पालिकेने ९ आॅक्टोबर २०१० ला केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत ठेकेदाराद्वारे स्थानिक परिवहन सेवा सुरू केली. पालिकेला त्यातून रॉयल्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. सुरुवातीला ही सेवा १०२ बसवर सुरू करण्यात आली. परंतु, या नवीन ५० बस तांत्रिकदृष्ट्या कमकुवत ठरल्याने प्रशासन व ठेकेदाराच्या योग्य पाठपुराव्याअभावी बसनिर्मिती करणाऱ्या कंपनीने कमी वेळेतच नादुरुस्त होत असलेल्या बसकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप परिवहन विभागाच्या सूत्रांकडून होत आहे. त्यातच या सेवेतील पूर्वीच्या ठेक्यातील बस नादुरुस्त झाल्याने ठेकेदाराने २०१२ मध्ये त्या भंगारात विकल्या. उर्वरित नवीन ५० बसही अवघ्या ३ वर्षांत नादुरुस्त झाल्याने त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय आहे. त्यातील सुमारे ४० बस सध्या प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यांवर धावत असल्याने दररोज सुमारे ५० हजार प्रवाशांना लाभदायक ठरणारी परिवहन सेवा डळमळीत झाली आहे. ८ ते १० बस निवडणुकीसाठी करारबद्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे वेळापत्रक कोलमडले आहे.